OPPO कंपनीनं भारतात OPPO F21 Pro Series सादर केली आहे. या सीरिजमध्ये Oppo F21 Pro आणि Oppo F21 Pro 5G असे दोन स्मार्टफोन्स आले आहेत. दोन्ही फोन्सच्या फीचर्समध्ये फरक फक्त प्रोसेसरचा आहे. OPPO F21 Pro सीरिज भारतात 64MP कॅमेरा, 90Hz रिफ्रेश रेट, 32MP सेल्फी कॅमेरा, 8GB RAM आणि फायबर ग्लास लेदर डिजाइनसह आली आहे.
OPPO F21 Pro सीरिजचे स्पेसिफिकेशन्स
ओप्पोच्या या दोन्ही स्मार्टफोन्समध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटसह देण्यात आला आहे. हा पंच होल डिस्प्ले कॉर्निग गोरिल्ला ग्लास 5 च्या सुरक्षेसह 600नीट्स पीक ब्राईटनेसला सपोर्ट करतो. फोन्सच्या मागे एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप आहे. ज्यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि 2 मेगापिक्सलचाच मॅक्रो सेन्सर मिळतो. फ्रंटला 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा आहे.
हे स्मार्टफोन 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेजसह लाँच झाले आहेत. परंतु यातील व्हर्च्युअल रॅम फिचरच्या मदतीनं 5जीबी अतिरिक्त रॅम मिळवता येतो. हे डिवाइस अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 12.1 वर चालतात. प्रोसेसिंगसाठी क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 680 चिपसेट 4G मॉडेलमध्ये देण्यात आला आहे. तर OPPO F21 Pro 5G मध्ये Qualcomm Snapdragon 695 SoC आहे.
फोन्समध्ये इन डिस्प्ले फिंगरप्रिंटची सुरक्षा देण्यात आली आहे. तसेच या ड्युअल सिम फोनमध्ये बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स मिळतात. पावर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी मिळते. जी 33W SUPERVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीनं चार्ज करता येते.
OPPO F21 Pro सीरिजची किंमत
OPPO F21 Pro 4G सीरीज Sunset Orange आणि Cosmic Black कलर ऑप्शनमध्ये सादर झाली आहे. तसेच OPPO F21 Pro 5G स्मार्टफोन Rainbow Spectrum आणि Cosmic Black रंगात विकत घेता येईल. OPPO F21 Pro 4G ची किंमत 22,999 रुपये आहे. 5G व्हेरिएंटसाठी 25,999 रुपये द्यावे लागतील.