Oppo Find N: OPPO INNO DAY 2021 अंतर्गत कंपनी नवनवीन डिव्हाइसेस सादर करत आहे. यात आतापर्यंत कंपनीनं आपल्या चिपसेटची तसेच स्मार्ट ग्लासेसची घोषणा केली आहे. तर आज OPPO नं आपला सर्वात पहिला फोल्डेबल स्मार्टफोन Find N लाँच केला आहे. चार वर्षांच्या रिसर्च आणि डेवलपमेंट (R&D) आणि 6 प्रोटोटाइपनंतर कंपनीनं हा फोन जगासमोर ठेवला आहे.
OPPO Find N चे स्पेसिफिकेशन्स
OPPO Find N स्मार्टफोन लुक आणि डिजाइनच्या बाबतीत Samsung Galaxy Z Fold 3 सारखाच आहे. म्हणजे हा फोन आतल्या बाजूस फोल्ड होतो. फोल्ड झाल्यावर या फोनच्या बाहेरील डिस्प्लेचा फोन म्हणून वापर करता येतो. तर आतल्या मोठ्या डिस्प्लेवर मुव्हीज, मल्टी टास्किंग, गेमिंग करणं सोपं होतं. या फोनच्या आतील मोठ्या डिस्प्लेचा आकार 7.1 इंच आहे. तर बाहेरील डिस्प्ले 5.49 इंचाचा आहे. मेन डिस्प्लेमध्ये डावीकडे पंच-होल सेल्फी कॅमेरा आहे तर बेहरील डिस्प्ले वॉटरड्रॉप नॉचसह सह येतो. या फोनमध्ये साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे.
OPPO Find N मध्ये 12 लेयर असलेला सिरीन डिस्प्ले पॅनल देण्यात आला आहे. या फोनच्या फोल्डिंग मॅकॅनिज्ममध्ये स्मूद अनुभवासाठी फ्लेक्सिऑन हिंजचा वापर करण्यात आला आहे. डिस्प्लेच्या वर 0.03mm ची फ्लेक्सिऑन UTG (अल्ट्रा थीन ग्लास) ची कोटिंग देण्यात आली आहे. या फोनचा मेन डिस्प्ले LTPO पॅनल आणि 120Hz डायनॅमिक रिफ्रेश रेटसह सादर करण्यात आला आहे, जो 1000Hz टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो.
या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 50MP चा Sony IMX 766 प्रायमरी सेन्सर मिळतो. त्याचबरोबर 16MP चा अल्ट्रा वाईड अँगल सेन्सर आणि 13MP चा टेलिफोटो सेन्सर देण्यात आला आहे. दोन्ही डिस्प्लेमध्ये असलेल्या सेल्फी कॅमेऱ्यांची मात्र माहिती मिळाली नाही.
OPPO Find N मध्ये Qualcomm Snapdragon 888 प्रोसेसरची ताकद देण्यात आली आहे. सोबत 12GB पर्यंतचा लेटेस्ट LPDDR5 RAM आणि 512GB पर्यंतची वेगवान UFS 3.1 स्टोरेज मिळते. या फोनमध्ये पॉवर बॅकअपसाठी 4,500mAh ची बॅटरी मिळते. ही बॅटरी 33W SuperVOOC फ्लॅश चार्जिंग टेक्नॉलॉजीनं चार्ज करता येईल. तसेच हा फोन 15W AIRVOOC वायरलेस चार्जिंगला देखील सपोर्ट करतो.
OPPO Find N Price
OPPO Find N चे दोन व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. या फोनचा 8GB RAM + 256GB असलेला व्हेरिएंट चीनमध्ये 7,999 युआन (जवळपास 92,100 रुपये) मध्ये विकत घेता येईल. तर 12GB RAM + 512GB स्टोरेज मॉडेलसाठी 8,999 युआन (जवळपास 1,07,600 रुपये) मोजावे लागू शकतात.
हे देखील वाचा:
4 हजार रुपयांपर्यंतच्या डिस्काउंटसह Realme चे स्मार्टफोन्स उपलब्ध; फ्लॅगशिप फोन देखील झाले स्वस्त
रक्तातील ऑक्सिजनचं प्रमाण सांगणारे ‘हे’ आहेत बेस्ट स्मार्टवॉच; आधीच देतील आजारांची सूचना