देशात ५ जीचे वारे वाहू लागले असून २०२१ पर्यंत ही सुपरफास्ट सेवा लाँच होण्याची शक्यता आहे. मात्र, त्यापूर्वीच मोबाईल कंपन्यांनी वातावरण निर्मिती सुरु केली आहे. शाओमी, मोटरोलानंतर आता ओप्पोने 5G चा स्मार्टफोन लाँच केला आहे.
ओप्पोने Oppo Find X2 Neo हा स्मार्टफोन सध्या जर्मनीमध्ये लाँच केला असून या फोनमध्ये कर्व्हड डिस्प्ले देण्यात आला आहे. या डिस्प्लेचा रिफ्रेश रेट ९० Hz आहे. हा फोन जर्मनीमध्ये ६९९ युरोना लाँच केला आहे. भारतात याची किंमत ५८००० रुपये एवढी होते. सध्यातरी कंपनीने भारताता या फोनच्या लाँचिंगबाबत काही खुलासा केलेला नाही. मात्र, लवकरच हा फोन भारतात येण्याची शक्यता आहे.
महत्वाचे म्हणजे हा सिंगल सिम स्मार्टफोन आहे. यामध्ये ६.५ इंचाचा AMOLED डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन ओप्पो अँड्रॉईड १० बेस्ड ColorOS 7 वर आधारित आहे. यामध्ये क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ७६५जी प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच १२ जीबी रॅमसह २५६ जीबी स्टोरेज देण्यात आले आहे.
फोटोग्राफीसाठी यामध्ये क्वाड कॅमेरा देण्यात आला असून पहिला कॅमेरा ४८ मेगापिक्सलचा आहे. तर १३ एमपीचा टेलिफोटो कॅमेरा, ८ एमपीचा वाईड अँगल कॅमेरा आणि २ एमपीचा डेप्थ कॅमेरा देण्यात आला आहे. सेल्फासाठी ३२ एमपीचा कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच ४०२५ एमएएचची बॅटरी देण्यात आली असून यामध्ये VOOC फ्लॅश चार्ज ४.० देण्यात आले आहे. डिस्प्लेमध्ये फिंगरप्रिंट सेन्सर आहे.
अन्य महत्वाच्या बातम्या....
देशाचा जीडीपी शुन्याखाली जाण्याची शक्यता; आरबीआय गव्हर्नर शक्तीकांत दास यांचा अंदाज
CoronaVirus कोरोनाची मजल पुढच्या सूर्य ग्रहणापर्यंतच; काशीच्या ज्योतिषाचार्यांचे मोठे संकेत
कर्जदारांना मोठा दिलासा; EMI वर आरबीआयचा निर्णय
खूशखबर! महागाई रोखण्यासाठी रेपो रेटमध्ये कपात; रिझर्व्ह बँकेचा कर्जदारांना मोठा दिलासा
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ८३ दिवसांनी दिल्ली सोडली; ओडिशा, पश्चिम बंगालचा पाहणी दौरा
चीनची एकी! स्पर्धक असुनही शाओमी, ओप्पो, वनप्लस, व्हिवो आले एकत्र