सॅमसंगने फोल्डेबल फोन सेगमेंटमध्ये गेल्या दोन वर्षांपासून धुमाकूळ घातला आहे. हुवावे, शाओमी आणि इतर काही ब्रँड्सनी देखील फोल्डेबल फोन लाँच केले आहेत. विशेष म्हणजे ओप्पोने देखील आपला फोल्डेबल फोन 2019 मध्ये जगासमोर ठेवला होता, परंतु हा फोन ग्राहकांच्या भेटीला आला नाही. आता मात्र फोल्डेबल फोन सेगमेंटमध्ये ओप्पो देखील पदार्पण करू शकते.
सॅमसंगने Galaxy Z Fold आणि Galaxy Z Flip अशा दोन सीरीजमध्ये फोल्डबल डिस्प्ले असलेले फोन सादर केले आहेत. आता फोल्डेबल स्मार्टफोन कॅटेगरीमध्ये ओप्पो सॅमसंगला टक्कर देऊ शकते. OPPO Foldable Phone पुढील महिन्यात लाँच केला जाऊ शकतो, अशी माहिती टिपस्टर डिजिटल चॅट स्टेशनने दिली आहे. चीनी सोशल मीडिया अकॉउंटवरून या फोनच्या डिस्प्ले साइज, प्रोसेसर आणि कॅमेरा डिटेल्ससह इतर स्पेक्स लीक करण्यात आले आहेत.
OPPO Foldable Phone चे लीक स्पेसिफिकेशन
लिक्स्टरने दिलेल्या माहितीनुसार, हा फोन 7.8 ते 8-इंचाच्या डिस्प्लेसह बाजारात येऊ शकतो. हा डिस्प्ले सॅमसंगच्या Galaxy Z Fold 3 पेक्षा मोठा डिस्प्ले असेल. प्रोसेसिंगसाठी कंपनी क्वालकॉमच्या फ्लॅगशिप प्रोसेसर Snapdragon 888 चा वापर करू शकते. हाच प्रोसेसर सॅमसंगच्या फोल्डेबलमध्ये देण्यात आला आहे.
ओप्पो फोल्डेबल फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा दिला जाऊ शकतो, जो Sony IMX766 सेन्सर असेल. या फोनमध्ये 32 MP चा सेल्फी कॅमेरा देण्यात येईल. हा फोन कंपनी अँड्रॉइड 11 आधारित ColorOS 12 सह बाजारात आणू शकते. हा फोनच्या किंमतीची माहिती मात्र अजून समजली नाही. यासाठी आपल्याला कंपनीच्या घोषणेची वाट बघावी लागेल.