Oppo Foldable Smartphone गेले कित्येक दिवस फक्त बातम्यांमधून समोर आला आहे. कंपनीचे चाहते या स्मार्टफोनची आतुरतेनं वाट बघत आहेत. कंपनीच्या सर्वात पहिल्या फोल्डेबल स्मार्टफोनबाबत मात्र ओप्पोनं कोणतीही अधिकृत माहिती दिली नाही. परंतु आता या फोनच्या लाँचची तारीख लीक झाली आहे.
एका टिपस्टरनं दिलेल्या माहितीनुसार, ओप्पोचा पहिला फोल्डेबल फोन यावर्षीच्या शेवटी म्हणजे डिसेंबर 2021 च्या शेवटच्या आठवड्यात लाँच कारणात आहे. तर टेक वेबसाईट MyFixGuide च्या एक रिपोर्टमध्ये हा फोन Inno Day Conference 2021 मध्ये सादर केला जाईल, असं सांगण्यात आलं आहे. त्यानुसार, Oppo Foldable स्मार्टफोन 14 डिसेंबरला सादर केला जाऊ शकतो.
Oppo Foldable Phone चे संभाव्य स्पेक्स
मीडिया रिपोर्टनुसार, ओप्पोचा सर्वात पहिला फोल्डेबल फोन कंपनीच्या फाईंड सीरिजमध्ये सादर केला जाईल. ही एक फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज आहे. हा फोन बाजारात Oppo Find N नावानं दाखल होईल. या फोनमध्ये 8 इंचाचा मोठा AMOLED डिस्प्ले मिळू शकतो. हा डिस्प्ले 2K रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करू शकतो. कंपनी यात 50MP चा रियर कॅमेरा मिळेल आणि सेल्फीसाठी यात 32MP चा सेन्सर दिला जाऊ शकतो.
रिपोर्टनुसार, ओप्पोच्या फोल्डेबल स्मार्टफोनमध्ये आतल्या बाजूला फोल्ड होणारा डिस्प्ले मिळेल. असा डिस्प्ले Samsung Galaxy Z Fold 3 मध्ये देण्यात आला होता. या फोनच्या बाहेरील डिस्प्ले कर्व्ड डिजाईनसह सादर केला जाईल, ज्याचा रिफ्रेश रेट देखील 60hz असेल. या फोल्डेबल फोनमध्ये Snapdragon 888 SoC चिपसेटचा वापर केला जाऊ शकतो.