Oppo नं आपल्या ऑपरेटिंग सिस्टमच्या नव्या अपडेट एक नवीन फीचर सादर केलं आहे. हे फिचर जास्त प्रवास करणाऱ्या लोकांसाठी उपयुक्त ठरू शकतं. तसेच या फिचरच्या मदतीनं स्पा, सार्वजनिक वॉशरूम, चेंजिंग रूम किंवा हॉटेलच्या खोलीतील Hidden कॅमेऱ्यांची माहिती मिळू शकते. हे फिचर Oppo Find X5 आणि Find X5 Pro या कंपनीच्या फ्लॅगशिप स्मार्टफोन्सवर दिसलं आहे.
नवीन ColorOS व्हर्जनमुळे युजर्स खोलीतील कोणत्याही स्पाय कॅमेऱ्याचा वायरलेस सिग्नल स्कॅन करू शकतील. छुपे इलेक्ट्रॉनिक्स किंवा इलेक्ट्रॉनिक कंपोनेंट्स शोधण्यासाठी ही सिग्नल डिटेक्शन पद्धत बनवण्यात आली आहे. याची माहिती ओप्पोनं चीनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म Weibo वरून दिली आहे. त्यानुसार, ColorOS 12.1 मुळे छुपे कॅमेरे शोधात येतील. सध्या हे फीचर Find X5 स्मार्टफोनमध्ये Hidden Camera Detection अॅपच्या माध्यमातून अॅक्सेस करता येईल. लवकरच हे फिचर अन्य फोन्समध्ये आणि जागतिक स्थरावर उपलब्ध होईल.
Oppo App Market मध्ये हे अॅप सध्या बीटा व्हर्जनमध्ये उपलब्ध आहे. हे डाउनलोड केल्यानंतर स्पाय कॅमेरा स्कॅन करण्यासाठी युजर्सना फोनचा Wi-Fi आणि हॉटस्पॉट बंद करण्यासाठी सांगितलं जातं. तसेच खोलीतील लाईट्स देखील बंद करण्यास सांगितलं जातं. त्यामुळे अंधारातून स्पाय कॅमेऱ्याची इंफ्रारेड लाईट डिटेक्ट करता येते, जी व्हिडीओ रेकॉर्ड करण्यासाठी वापरली जाते. स्पाय कॅमेरा डिटेक्ट झाल्यावर अॅप मधून आवाज येतो.
हे देखील वाचा: