Oppo K10 5G भारतात लाँच झाला आहे. हा ओप्पोच्या सर्वात स्वस्त 5G फोन्स पैकी एक आहे. जो मिडरेंजमध्ये सादर करण्यात आला असून याची विक्री फ्लिपकार्टच्या माध्यमातून केली जाईल. या फोनचा 4G व्हेरिएंट भारतीय बाजारात आधीपासून आहे. परंतु आता 5G मॉडेल 8GB RAM, 5000mAh बॅटरी, 48MP कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंगसह सादर करण्यात आला आहे.
Oppo K10 5G चे स्पेसिफिकेशन्स
Oppo K10 5G स्मार्टफोनमध्ये 1612×720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 6.56 इंचाचा HD+ Incell LCD डिस्प्ले देण्यात आला आहे. जो 89.8 टक्केस्क्रीन टू बॉडी रेशियो, 20.1:9 अस्पेक्ट रेशियो आणि 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. फोनमध्ये Mediatek Dimensity 810 प्रोसेसर देण्यात आला आहे. तसेच हा डिवाइस Android 12 बेस्ड ColorOS 12.1 वर चालतो. यात 8GB RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज मिळते. यातील स्टोरेज 1TB पर्यंत तर रॅम 5GB पर्यंत वाढवता येतो.
Oppo K10 5G मध्ये ड्युअल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. यात 48MP चा मेन कॅमेरा आणि 2MP चा दुसरा कॅमेरा आहे. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोनच्या फ्रंटला 8MP चा कॅमेरा मिळतो. बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्ससह एम्बिएंट लाईट , प्रॉक्सिमिटी, जियोमॅग्नेटिक सेन्सर आणि एक्सेलेरोमीटर फिचर मिळतं. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 33W SuperVOOC फास्ट चार्जिंगसह 5000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Oppo K10 5G ची किंमत
Oppo K10 5G स्मार्टफोनचा एकमेव व्हेरिएंट 17499 रुपयांमध्ये लाँच करण्यात आला आहे. याची विक्री 15 जून, 2022 दुपारी 12 वाजल्यापासून Flipkart वरून केली जाईल. यावर लाँच ऑफर अंतर्गत SBI, Kotak, Axis आणि Bank of Baroda च्या कार्ड धारकांना 1500 रुपयांचा डिस्काउंट मिळेल.