Oppo नं चीनमध्ये आपल्या के सीरिजचा विस्तार केला आहे. कंपनीनं OPPO K10 5G आणि OPPO K10 Pro नावाचे दोन हँडसेट सादर केले आहेत. यातील वॅनिला मॉडेल जगातील पहिला स्मार्टफोन आहे ज्यात MediaTek Dimensity 8000 MAX चिपसेटचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर 12GB RAM, 5000mAh बॅटरी, 67W फास्ट चार्जिंग आणि 120Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे.
OPPO K10 5G चे स्पेसिफिकेशन्स
ओप्पो के10 5जी मध्ये 6.59 इंचाचा फुलएचडी एलसीडी पॅनल देण्यात आला आहे, जो 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. कंपनीनं याला पांडा ग्लासची सुरक्षा दिली आहे. अँड्रॉइड 12 आधारित डिवाइस कलरओएस 12 चालतो. मीडियाटेक डिमेनसिटी 8000 मॅक्स चिपसेटसह यात एआरएम ओडिन एमसी6 जीपीयू देण्यात आला आहे.
फोटोग्राफीसाठी ओप्पो के10 5जी ट्रिपल रियर आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर आहे. सेल्फीसाठी 16 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. साईड पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सरसह यात बेसिक कनेक्टिव्हिटी फीचर्स देण्यात आले आहेत. पावर बॅकअपसाठी 5,000एमएएच बॅटरी 67W SuperVOOC चार्जिंग टेक्नॉलॉजीसह मिळते.
OPPO K10 5G ची किंमत
ओप्पो के10 5जी फोनच्या 8GB RAM व 128GB स्टोरेजची किंमत 1999 युआन (सुमारे 23,400 रुपये) आहे. 8GB RAM व 256GB स्टोरेज व्हेरिएंट 2199 युआन (सुमारे 25,700 रुपये) मध्ये विकत घेता येईल. तर टॉप एन्ड 12GB RAM व 256GB स्टोरेज मॉडेलची किंमत 2499 युआन (सुमारे 29,200 रुपये) आहे. हा फोन भारतात कधी येईल हे अजूनतरी समजले नाही.