ओप्पोने आपला नवीन फ्लॅगशिप स्मार्टफोन चीनमध्ये सादर केला आहे. कंपनीने हा नवीन मोबाईल फोन OPPO K9 Pro नावाने सादर केला आहे. या फोनमध्ये मीडियाटेकच्या फ्लॅगशिप प्रोसेसरचा वापर करण्यात आला आहे. त्याचबरोबर यात 64MP कॅमेरा, 60W फास्ट चार्जिंग, 120Hz रिफ्रेश रेट आणि 12GB रॅम असे दमदार स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत.
OPPO K9 Pro चे स्पेसिफिकेशन्स
ओप्पो के9 प्रो मध्ये कंपनीने 120Hz रिफ्रेश रेट आणि 180Hz टच सॅम्पलिंग रेट असलेला अॅमोलेड डिस्प्ले दिला आहे. ज्याचा आकार 6.43 इंच आणि रिजोल्युह्सन फुलएचडी+ आहे. अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 11 वर चालणार हा फोन मीडियाटेक डिमेन्सिटी 1200 चिपसेटला सपोर्ट करतो. तसेच यात UFS 3.1 स्टोरेज देण्यात आली आहे.
OPPO K9 Pro मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स देण्यात आली आहे. हा 5G फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. बेसिक कनेक्टिविटी फीचर्ससह यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. तसेच पॉवर बॅकअपसाठी फोनमध्ये 4,500एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे. जी 65वॉट फ्लॅश चार्ज टेक्नॉलॉजीच्या मदतीने फक्त 16 मिनिटांत 0 ते 50 टक्क्यांपर्यंत चार्ज करता येते.
OPPO K9 Pro ची किंमत
ओप्पो के9 चे दोन व्हेरिएंट्स बाजारात आले आहेत. या फोनचा 8GB RAM आणि 128GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2199 युआन म्हणजे जवळपास 25,000 रुपये आहे. तर 12GB RAM आणि 256GB स्टोरेज असलेला व्हेरिएंट 2699 युआन म्हणजे सुमारे 30,500 रुपयांमध्ये विकत घेता येईल. हा फोन लवकरच जागतिक बाजारात उतरवला जाऊ शकतो.