Oppo K9s Price and Specs: ठरल्याप्रमाणे ओप्पोच्या ‘के9’ सीरीज अंतगर्त नवीन स्मार्टफोन OPPO K9s लाँच झाला आहे. हा मिडरेंज स्मार्टफोन सध्या चीनमध्ये झाला आहे. ज्यात 8GB RAM, Snapdragon 778G SoC, 120Hz Refresh Rate, 64MP Camera आणि 5,000mAh Battery असे भन्नाट फीचर्स देण्यात आले आहेत. चला जाणून घेउया या Oppo Phone ची सविस्तर माहिती.
OPPO K9s चे स्पेसिफिकेशन्स
OPPO K9s च्या बॅक पॅनलवर ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. या कॅमेरा सेटअपमध्ये एलईडी फ्लॅश मिळतो आणि सोबत 64 मेगापिक्सलचा प्रायमरी वायड अँगल सेन्सर, 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड अँगल कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलचा मॅक्रो सेन्सर देण्यात आला आहे. या नवीन ओप्पो फोनमध्ये 16 मेगापिक्सलचा सेल्फी शुटर फ्रंटला देण्यात आला आहे.
या डिवाइसमध्ये कंपनीने 6.59 इंचाचा फुलएचडी+ एलसीडी डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 120हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 240हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. या 5G फोनला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर मिळते. तसेच 8GB पर्यंतचा RAM आणि 128GB इंटरनल स्टोरेज देण्यात आली आहे. OPPO K9s स्मार्टफोन अँड्रॉइड 11 आणि कलरओएस 11.2 वर चालतो. पॉवर बॅकअपसाठी या ओप्पो फोनमध्ये 5,000एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे, जी 30वॉट फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
OPPO K9s ची किंमत
- 6GB RAM + 128GB Storage: 1,699 युआन (सुमारे 19,900 रुपये)
- 8GB RAM + 128GB Storage: 1,899 युआन (सुमारे 22,000 रुपये)
हा फोन चीनमध्ये ब्लॅक, सिल्वर आणि पर्पल रंगात उपल्बध झाला आहे. हा फोन लवकरच भारतासह जागतिक बाजारात सादर केला जाऊ शकतो.