ओप्पो लवकरच शाओमील फास्ट चार्जिंगच्या बाबतीत मात देणार आहे, असे दिसत आहे. कंपनी एक दोन नव्हे तर 5 स्मार्टफोन 125W सुपरफास्ट चार्जिंगसह सादर करणार आहे. यात Oppo, Oneplus आणि Realme फोन्सचा समावेश आहे. वनप्लस आणि रियलमीओप्पोचेच सब-ब्रँड आहेत. हे फोन्स पुढीलवर्षी ग्राहकांच्या भेटीला येतील.
मिलेल्या माहितीनुसार, पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत 125W सुपरफास्ट चार्जिंगसह Oppo Find X4 लाँच केला जाईल. तसेच Oppo Reno 8 आणि Oneplus 10 सीरीजमधील फोन देखील 125 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीसह बाजारात येतील. ओप्पो सब-ब्रँड Realme देखील या शर्यतीत सहभागी होणार आहे. कंपनीचे काही फोन देखील 125 वॉट सुपरफास्ट चार्जिंगसह बाजारात येतील.
या फोन्सची माहिती टिपस्टर मुकुल शर्माने ट्विटरवरून दिली आहे. त्याने एका एक ट्विटमधून वीबोवरील एक स्क्रीन शॉट शेयर केला आहे. या स्क्रिनशॉटमध्ये 125 वॉट चार्जिंगसह लाँच होणाऱ्या फोन्सची यादी आहे. या यादीत Oppo Find X4, Realme GT 2 Pro, Oneplus 10, Oppo Reno 8 आणि Oppo च्या नवीन N सीरीजच्या फोन्सचा समावेश आहे.
काही दिवसांपूर्वी शाओमीने 200W वायर्ड फास्ट चार्जिंगचे प्रदर्शन केले होते. परंतु व्यवसायिकरित्या कंपनीने आतापर्यंत 120W फास्ट चार्जिंग असलेले फोन्स सादर केले आहेत. त्यामुळे ओप्पोच्या 125W फास्ट चार्जिंगबाबत टेक विश्व उत्सुक आहे. 125 वॉट फास्ट चार्जींगच्या मदतीने 5,000 एमएएच बॅटरी फक्त 21 मिनिटांत 0 ते 100% चार्ज होऊ शकते.