Oppo नं टॅबलेट सेगमेंटमध्ये पदार्पण केलं आहे. कंपनीनं Find X5 सीरीजच्या स्मार्टफोन्ससह आपला टॅब Oppo Pad सादर केला आहे. या टॅबलेटमध्ये 120Hz रिफ्रेश रेट, स्मार्ट स्टायलस सपोर्ट, Snapdragon 870 प्रोसेसर आणि 8360mAh ची बॅटरी असे स्पेसिफिकेशन्स देण्यात आले आहेत. सध्या हा डिवाइस चीनमध्ये आला आहे परंतु लवकरच जागतिक बाजारात देखील ओप्पो पॅड दाखल होईल, अशी अपेक्षा आहे.
Oppo Pad ची वैशिष्ट्ये
Oppo Pad टॅबलेटमध्ये 11 इंचाचा मोठा आयपीएस एलसीडी डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेट, 2560 x 1600 पिक्सल रिजोल्यूशन, HDR10 आणि 10-बिट कलरला सपोर्ट करतो. हा टॅबलेट स्टायलस सपोर्टसह बाजारात आला आहे, जो मॅग्नेटिकली चार्ज करता येतो. 507 ग्रामचा हा दिवशी फक्त 6.99mm जाड आहे.
या टॅबलेटला क्वालकॉमच्या स्नॅपड्रॅगन 870 चिपसेटची ताकद देण्यात आली आहे. सोबत 8GB पर्यंत रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज मिळते. टॅब अँड्रॉइड 11 बेस्ड कलर ओएसवर चालतो. ओप्पोच्या टॅबमध्ये एलईडी फ्लॅशसह 13MP चा सिंगल रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तर फ्रंटला 8MP चा सेल्फी सेन्सर आहे. यात 33W फास्ट चार्जिंग सपोर्टसह 8360mAh ची बॅटरी देण्यात आली आहे. जी सिंगल चार्जवर 16 तासांपर्यंतचा व्हिडीओ प्लेबॅक देऊ शकते, असा दावा ओप्पोनं केला आहे.
Oppo Pad ची किंमत
Oppo Pad चे रॅम आणि स्टोरेज व्हेरिएंट सादर करण्यात आले आहेत. यातील 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेजची किंमत 2,299 युआन (जवळपास 27,500 रुपये) ठेवण्यात आली आहे. तर 6GB रॅम आणि 128GB इंटरनल स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 2699 युआन (जवळपास 32,300 रुपये) आहे. सर्वात मोठ्या 8GB रॅम आणि 256GB इंटरनल स्टोरेज मॉडेलसाठी 2,999 युआन (जवळपास 38,800 रुपये) मोजावे लागतील.
हे देखील वाचा: