नवी दिल्ली : Oppo कंपनीचा नवीन स्मार्टफोन बाजारात आला आहे. नवी दिल्लीमध्ये आयोजित एका कार्यक्रमात कंपनीने Realme 2 हा नवीन स्मार्टफोन लाँच केला. 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरेज मेमरी आणि 4जीबी/64 जीबी इंटरनल स्टोरेज मेमरी असलेल्या दोन व्हेरियंटमध्ये कंपनीने Realme 2 बाजारात आणला आहे. विशेष म्हणजे, दहा हजार रुपयांपेक्षा कमी किंमतीत भारतात मिळणारा Realme 2 हा पहिला फुल नॉच डिस्प्ले स्मार्टफोन आहे.
Realme 2 च्या 3 जीबी रॅम, 32 जीबी स्टोरज मेमरी असलेल्या स्मार्टफोनची किंमत 8,990 रुपये आहे. तर, 4 जीबी/64 जीबी इंटरनल स्टोरेजची किंमत 10,990 रुपये आहे. या स्मार्टफोनची विक्री पहिल्यांदा 4 सप्टेंबर रोजी 12 वाजता फ्लिपकार्टवर सुरु होणार आहे. तसेच, हा स्मार्टफोन डायमंड रेड, डायमंड ब्लॅक आणि डायमंड ब्लू अशा तीन कलरमध्ये लाँच करण्यात आला. दरम्यान, डायमंड ब्लू कलरचा स्मार्टफोन ग्राहकांना ऑक्टोबर महिन्यात मिळणार आहे. तर, बाकीचे दोन्ही कलर 4 सप्टेंबरपासून मिळणार आहेत.
Realme 2 स्मार्टफोनमध्ये 6.2 इंचाचा फुल स्क्रीन डिस्प्ले देण्यात आला आहे. तसेच, यामध्ये ऑक्टा-कोर स्नॅपड्रॅगन 450 प्रोसेसर आहे. 3 जीबी आणि 4 जीबी रॅमचे दोन ऑप्शन देण्यात आले आहेत. कॅमेरा 13 मेगापिक्सल आणि 2 मेगापिक्सलचा ड्युअल रिअर कॅमेरा आहे. या रिअर कॅमेऱ्यात पोट्रेट मोड सुद्धा देण्यात आला आहे. तसेच, 8 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे.