भारतीय बाजारात व्हिवोच्या उपकंपन्यांनी गेल्या आठवडाभरात धडाधड वेगवेगळ्या कॉम्बिनेशनचे स्मार्टफोन लाँच केले आहेत. यामुळे कोणता घेऊ कोणता नको अशी परिस्थिती उद्भवली आहे. आजच ओप्पोने Reno 10 सिरीजमध्ये तीन स्मार्टफोन लाँच केले आहेत. यामध्ये धासू कॅमेरे देण्यात आले आहेत.
ओप्पोने Oppo Reno 10 5G, Reno 10 Pro 5G आणि Reno 10 Pro+ 5G स्मार्टफोन लाँच केले आहेत. Reno 10 5G ची किंमत २० जुलैला जाहीर केली जाणार आहे. तर उर्वरित दोन फोनची किंमत जाहीर केली आहे. Reno 10 Pro 5G ची 39,999 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे. तर Pro+ ची किंमत 54999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे दोन्ही फोन ग्लॉसी पर्पल आणि सिल्वर ग्रे कलरमध्ये उपलब्ध असणार आहेत. तर Reno 10 5G हा आइस ब्लू आणि सिल्वरी ग्रे कलरमध्ये असणार आहे.
Oppo Reno 10 Pro+ 5G चे फिचर्सOppo Reno 10 Pro आणि प्रो प्लसमध्ये तीन मोठे बदल आहेत. Oppo Reno 10 Pro+ मध्ये ऑक्टा-कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 8+ जेन 1 SoC देण्यात आलेला आहे. तर पोट्रेट फोटोंसाठी 64 मेगापिक्सल कॅमेरा देण्यात आलेला आहे. दोन्ही फोनमध्ये HDR 10+ सपोर्ट आणि 6.74 इंचाचा AMOLED 3D कर्व्ड डिस्प्ले देण्यात आला आहे. १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. 100W SuperVOOC आणि 4700 एमएएचची बॅटरी देण्यात आली आहे.
दोन्ही फोनमध्ये Sony IMX890 ५० मेगापिक्सल मेन सेन्सर देण्यात आला आहे. ३२ मेगापिक्सलचा सोनीचा सेल्फी सेंसर आहे. Oppo Reno 10 Pro 5G मध्ये सोनीच 32 मेगापिक्सल टेलीफोटो सेंसर देण्यात आला आहे. 8 मेगापिक्सलचा वाइड-एंगल कॅमेरा सेंसर आहे. तर यामध्ये 80W SuperVOOC आणि 4600mAh बॅटरी देण्यात आली आहे.