OPPO ने आज भारतात Reno सीरिज लाँच केली आहे. या सीरिजमधील Reno 6 5G आणि Reno 6 Pro 5G स्मार्टफोनपैकी Reno 6 5G हा स्वस्त आणि छोटा स्मार्टफोन आहे. या फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा, 8GB रॅम आणि 128GB स्टोरेज देण्यात आली आहे. फोनमधील रॅम 3GB/5GB पर्यंत वाढवता येतो. (Oppo Reno 6 5G will be available on Flipkart in Rs 29,990)
Reno 6 ची किंमत आणि ऑफर्स
Reno 6 स्मार्टफोन Flipkart वर Aurora आणि Steller Glow अश्या दोन रंगात उपलब्ध होईल. हा फोन 8GB रॅम + 128GB स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनची किंमत 29,990 रुपये ठेवण्यात आली आहे. 20 जुलैपासून हा फ्लिपकार्ट आणि ऑफलाईन स्टोर्सवरून विकत घेता येईल. या फोनच्या खरेदीवर 4,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल.
OPPO Reno 6 5G चे स्पेसिफिकेशन्स
Reno 6 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा ओएलईडी कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. जैसे डिजाइन आणि फीचर्ससह येतो. या ओप्पो फोनमध्ये 8GB रॅम आणि 5GB वर्च्युल रॅम मिळून यात 13GB पर्यंत रॅम सपोर्ट मिळू शकतो. या फोनमध्ये 128GB ची स्टोरेज मिळते. हा फोन MediaTek Dimensity 900 SoC वर चालतो.
Reno 6 5G मधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा मिळतो. या मुख्य कॅमेऱ्याला 8 मेगापिक्सल अल्ट्रा वाईड कॅमेरा आणि 2 मेगापिक्सलच्या मॅक्रो कॅमेऱ्याची जोड देण्यात आली आहे. हा फोन 32MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. हा फोन Android 11 वर आधारित ColorOS 11.3 वर चालतो. या फोनमध्ये 4,300mAh ची बॅटरी मिळते.