Oppo नं काही दिवसांपूर्वी आली फ्लॅगशिप Reno 6 सीरीज जागतिक बाजारात सादर केली होती. आता या सीरिजमधील लाईट स्मार्टफोन देखील कंपनीनं मॅक्सिकोमध्ये Oppo Reno 6 Lite नावानं सादर केला आहे. यात Snapdragon 662 प्रोसेसर, 6GB RAM, 48MP चा ट्रिपल रियर कॅमेरा आणि 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.
Oppo Reno 6 Lite चे स्पेसिफिकेशन्स
Oppo Reno 6 Lite स्मार्टफोनमध्ये 6.43-इंचाचा फुल एचडी+ अॅमोलेड डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले पंच होल कटआउटसह येतो आणि यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. प्रोसेसिंगसाठी कंपनीनं क्वालकॉमच्या Snapdragon 662 चिपसेटचा वापर केला आहे. सोबत 6GB RAM आणि 128GB स्टोरेज मिळते. Oppo चा हा फोन Android 11 आधारित ColorOS 11 UI वर चालतो.
Oppo Reno 6 Lite स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 48MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 2MP चे दोन सेन्सर मिळतात. हा फोन 16MP च्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी या ओप्पो फोनमध्ये 5,000mAh ची बॅटरी देण्यात आली आहे जी 33W रॅपिड चार्जिंगला सपोर्ट करते.
Oppo Reno 6 Lite ची किंमत
Oppo Reno 6 Lite चा एकमेव व्हेरिएंट मेक्सिकोमध्ये सादर करण्यात आला आहे. जो ग्लोविंग रेनबो सिल्वर आणि ग्लोविंग स्टेरी ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. तिथे ओप्पोनं याची किंमत 8,799 MXN (सुमारे 32,200 रुपये) ठेवली आहे. हा स्मार्टफोन भारतासह जागतिक बाजारात कधी येईल याची माहिती मात्र मिळाली नाही.
हे देखील वाचा:
Flipkart Sale: इतक्या स्वस्तात मिळतोय iPhone 12; फक्त काही दिवस मिळणार अशी भन्नाट ऑफर