ओप्पोने गेल्या आठवड्यात भारतात आपल्या रेनो 6 सीरिजमध्ये दोन स्मार्टफोन लाँच केले होते. यात Oppo Reno 6 Pro 5G आणि Oppo Reno 6 5G चा समावेश करण्यात आला होता. हे दोन्ही स्मार्टफोन लाँच झाल्यावर प्री-बुकिंगसाठी उपलब्ध झाले होते. यापैकी Oppo Reno 6 Pro 5G आजपासून विक्रीसाठी उपलब्ध होईल. (Oppo Reno 6 Pro 5G sale in India today)
Oppo Reno 6 Pro 5G ची किंमत
Oppo Reno 6 Pro 5G फोन भारतात एकमेव 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंटमध्ये लाँच करण्यात आला आहे, या मॉडेलची किंमत 39,990 रुपये ठेवण्यात आली आहे. हा फोन 20 जुलै म्हणजे आजपासून ऑरोरा आणि स्टेलर ब्लॅक कलर ऑप्शनमध्ये विकत घेता येईल. ओप्पो रेनो 6 प्रो 5जी स्मार्टफोन ओप्पोच्या ऑनलाईन स्टोरसह फ्लिपकार्ट, रिलायन्स डिजिटल, विजय सेल्स, क्रोमा आणि इतर रिटेल स्टोर्सवरून विकत घेता येईल.
OPPO Reno 6 Pro 5G चे स्पेसिफिकेशन्स
OPPO Reno 6 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा ओएलईडी कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या ओप्पो फोनमध्ये MediaTek Dimensity 1200 SoC देण्यात आली आहे. फोनमध्ये 12GB रॅम देण्यात आला आहे, हा रॅम 7GB पर्यंत वर्च्युअली एक्सपांड करता येईल. थोडक्यात यात 19GB पर्यंत रॅम वापरता येईल. ओप्पो रेनो 6 प्रो 5जी फोन अँड्रॉइड 11 आधारित ColorOS 11.3 वर चालतो.
फोटोग्राफीसाठी OPPO Reno 6 Pro 5G मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा मोनो सेन्सर मिळतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. पावर बॅकअपसाठी Reno 6 Pro 5G मध्ये 65W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.