OPPO ने भारतात बहुप्रतीक्षित Reno सीरिज भारतात लाँच केली आहे. या सीरिजमध्ये Reno 6 आणि Reno 6 Pro 5G भारतात लाँच करण्यात आले आहेत. Reno 6 Pro मध्ये 64 मेगापिक्सलचा कॅमेरा, 65W फास्ट चार्जिंग असे दमदार फीचर्स देण्यात आले आहेत. तसेच हा स्मार्टफोन 12GB रॅम आणि 256GB स्टोरेजला सपोर्ट करतो. या फोनमधील रॅम एक्सपान्शनच्या मदतीने 3GB/5GB/7GB पर्यंत वर्चुअली वाढवता येतो. (OPPO Reno 6 Pro 5G Launched in India with price tag of 39,990 Rs.)
Oppo Reno 6 Pro ची किंमत
Reno 6 Pro ई-कॉमर्स वेबसाइट Flipkart च्या माध्यमातून विकला जाईल. हा फोन Aurora आणि Steller Glow अश्या दोन रंगात उपलब्ध होईल. Reno 6 Pro 5G चा एकमेव 12GB रॅम + 256GB स्टोरेज व्हेरिएंट 39,990 रुपयांमध्ये Flipkart सह ऑफलाइन रिटेलर्सच्या माध्यमातून 29 जुलैपासून विकत घेता येईल. हा फोनच्या खरेदीवर 4,000 रुपयांपर्यंतचा कॅशबॅक मिळेल.
OPPO Reno 6 Pro 5G चे फीचर्स
OPPO Reno 6 Pro 5G स्मार्टफोनमध्ये 6.5 इंचाचा ओएलईडी कर्व डिस्प्ले देण्यात आला आहे. हा डिस्प्ले 90Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करतो. या ओप्पो फोनमध्ये MediaTek Dimensity 1200 SoC देण्यात आली आहे. फोनमध्ये 12GB रॅम देण्यात आला आहे, हा रॅम 7GB पर्यंत वर्च्युअली एक्सपांड करता येईल. थोडक्यात यात 19GB पर्यंत रॅम वापरता येईल.
फोटोग्राफीसाठी OPPO Reno 6 Pro 5G मध्ये क्वाड रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात 64 मेगापिक्सलचा मुख्य कॅमेरा आहे. त्याचबरोबर फोनमध्ये 8 मेगापिक्सलचा अल्ट्रा वाईड कॅमेरा, 2 मेगापिक्सलचा मॅक्रो आणि 2 मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर मिळतो. सेल्फीसाठी फोनमध्ये 32 मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा देण्यात आला आहे. सिक्योरिटीसाठी या फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळतो. पावर बॅकअपसाठी Reno 6 Pro 5G मध्ये 65W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी देण्यात आली आहे.