ओप्पो आपल्या आगामी Reno 7 सीरीजवर काम करत आहे. Oppo Reno 7 सीरीजचे स्मार्टफोन पुढील महिन्यात सादर केले जाऊ शकतात. या सीरिजमध्ये कंपनी Oppo Reno7, Reno 7 Pro, आणि Reno 7 Pro+ असे तीन फोन सादर करू शकते. काही दिवसांपूर्वी या सीरिज मधील एक फोन PFDM00 या मॉडेल नंबरसह CMIIT सर्टिफिकेशन्स साईटवर लिस्ट करण्यात आला होता. लीकनुसार हा फोन OPPO Reno 7 स्मार्टफोन आहे. या लिस्टिंगमधून Oppo Reno 7 च्या समोर आलेल्या स्पेसिफिकेशन्सची माहिती जाणून घेऊया.
OPPO Reno 7 चे लीक स्पेसिफिकेशन्स
OPPO Reno 7 स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा डिस्प्ले मिळेल. OLED पॅनल Full HD+ रिजोल्यूशन आणि 90Hz रिफ्रेश रेटसह सादर केला जाईल. कंपनी या फोनमध्ये मीडियाटेकचा Dimensity 920 चिपसेट देऊ शकते. त्याचबरोबर LPDDR4x RAM आणि UFS 3.1 स्टोरेज असल्याची माहिती लिस्टिंगमधून समोर आली आहे. हा फोन 4,500mAh ची बॅटरी आणि 65W फास्ट चार्जिंगसह विकत घेता येईल.
फोटोग्राफीसाठी यात ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळेल. यातील प्रायमरी कॅमेरा 50 मेगापिक्सलचा Sony IMX766 सेन्सर असेल, ज्याला Sony IMX355 अल्ट्रा वाईड कॅमेरा सेन्सर आणि 2 मेगापिक्सलच्या ब्लॅक अँड व्हाइट पोर्टेड कॅमेरा सेन्सरची जोड देण्यात येईल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी Oppo Reno 7 मध्ये 32 मेगापिक्सलचा Sony IMX615 सेन्सर दिला जाऊ शकतो.
सिक्योरिटीसाठी यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर मिळेल. त्याचबरोबर फोनमध्ये ड्युअल स्पिकर, Z-axis लीनियर मोटर, vapor चेंबर लिक्विड कूलिंग प्लेट आणि NFC सपोर्ट मिळेल.
Oppo Reno 7 ची किंमत
ओप्पोचा हा फोन 8 GB RAM + 256 GB स्टोरेज आणि 12 GB RAM + 256 GB स्टोरेज अशा दोन व्हेरिएंट्समध्ये सादर केला जाऊ शकतो. यातील छोट्या व्हेरिएंटची किंमत 2,999 युआन (सुमारे ₹ 3500) असेल. तर मोठ्या व्हेरिएंटसाठी 3,299 युआन (सुमारे ₹ 38,700) मोजावे लागतील.