शहरं
Join us  
Trending Stories
1
'बटेंगे तो कटेंगे'ला उद्धव ठाकरेंचं उत्तर; म्हणाले, "तुटू देणार नाही आणि..."
2
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : 'ही लढाई महाराष्ट्रप्रेमी विरुद्ध महाराष्ट्रद्रोही'; उद्धव ठाकरेंनी कोल्हापुरातून रणशिंग फुंकलं
3
ठाकरे गटाची निवडणूक आयोगाकडे पुन्हा तक्रार; मिलिंद देवरांच्या प्रचारावर आक्षेप
4
रोहित नसेल तर बुमराहला कर्णधार करू नका, 'या' खेळाडूला कॅप्टन्सी द्या; माजी क्रिकेटरचा सल्ला
5
Salman Khan : सलमान खानला धमकी देणाऱ्याला अटक, स्वतःला म्हणत होता लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ
6
"आता कुठे तरी थांबलं पाहिजे, नव्या पिढीला...’’, शरद पवारांकडून राजकीय निवृत्तीचे संकेत?  
7
'बंटेंगे तो कटेंगे'... योगी आदित्यनाथ ठरणार निवडणुकीत 'ट्रम्प कार्ड', PM मोदींपेक्षा जास्त सभा घेणार!
8
महायुतीची सत्ता आल्यास मुख्यमंत्री कोण होणार? अजितदादांचे नाव घेत नवाब मलिकांचे मोठे विधान
9
याला म्हणतात परतावा...! 30 दिवसांत पैसा डबल...! कोसळत्या बाजारातही रॉकेट बनला हा शेअर; किंमत ₹10 पेक्षाही कमी
10
विराट 'बाबा' On Duty! दोन लेकरांसह विराट निघाला सफरीला, अनुष्काने शेअर केला खास Photo
11
कर्जत-जामखेडमध्ये रोहित पवारांची कोंडी?; नाम साधर्म्य असलेल्या उमेदवाराला मिळाले ट्रम्पेट चिन्ह!
12
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : संजय वर्मा महाराष्ट्राचे नवीन पोलीस महासंचालक; निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाची नियुक्ती
13
रेल्वे स्टेशनवर सुटकेमध्ये मृतदेह, गुपचूप पळणाऱ्या बाप-लेकीला पोलिसांनी ठोकल्या बेड्या
14
सुनील तटकरे महायुतीशी गद्दारी करतायेत; शिंदे गटाच्या आमदाराचा गंभीर आरोप
15
सेल्फीमुळे गेला जीव; राष्ट्रीय स्तरावर निवड झालेल्या टेबल टेनिसपटूंचा तलावात बुडून मृत्यू
16
IPL 2025 Mega Auction: MI शिवाय या ४ फ्रँचायझी संघात सेट होऊ शकतो Arjun Tendulkar
17
“उमेदवारी यादी आधीच दिली, ते माघारीचे कारण नाही, मनोज जरांगेंवर दबाव...”: राजरत्न आंबेडकर
18
"शाहू महाराजांना फोन आला अन् मधुरिमाराजेंनी..."; शेवटच्या १० मिनिटांत घडलेल्या राजकीय भूकंपाचे कारण समोर
19
"...मग पंतप्रधान कशाला होता, मुख्यमंत्री व्हा"; बारामतीतून शरद पवारांचा PM मोदींवर निशाणा
20
भारताच्या लाजिरवाण्या पराभवाने BCCI 'अ‍ॅक्शन मोड'मध्ये; गौतम गंभीरवर होणार प्रश्नांची सरबत्ती

फक्त 1,368 रुपयांमध्ये तुमचा होईल 12GB RAM आणि 32MP सेल्फी कॅमेरा असलेला फोन; जाणून घ्या Oppo Reno 7 Pro 5G वरील ऑफर 

By ऑनलाइन लोकमत | Published: March 05, 2022 7:23 PM

Oppo Reno 7 Pro 5G स्मार्टफोन 19GB RAM, 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा, 4450mAh बॅटरी आणि Mediatek Dimensity 1200 चिपसेटसह भारतीयांच्या भेटीला आला आहे.

काही दिवसांपूर्वी Oppo Reno 7 Pro 5G स्मार्टफोन भारतात सादर करण्यात आला होता. हा फोन 19GB RAM, 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंग, 50MP कॅमेरा, 4450mAh बॅटरी आणि Mediatek Dimensity 1200 चिपसेटसह भारतीयांच्या भेटीला आला आहे. सध्या फ्लिपकार्टवर हा ओप्पोच्यास्मार्टफोनवर डिस्काउंटसह उपलब्ध झाला आहे.  

Oppo Reno 7 Pro 5G ची किंमत आणि ऑफर 

Oppo Reno 7 Pro 5G स्मार्टफोनचा एकच 12GB RAM आणि 256GB स्टोरेज ऑप्शन भारतात उपलब्ध आहे. या फोनची किंमत 39,999 रुपये आहे, परंतु बँक ऑफरच्या माध्यमातून 10 टक्के डिस्काउंट मिळवता येईल. ही डिस्काउंट ऑफर BOB, Standard Chartered, HDFC, SBI आणि Yes Bank च्या क्रेडिट कार्डवर उपलब्ध आहे. तसेच तुम्हाला नो-कॉस्ट आणि स्टँडर्ड ईएमआयचा पर्याय देखील फ्लिपकार्टवर उपलब्ध आहेत, ज्यांची सुरुवात 1,368 रुपयांपासून सुरु होते.  

OPPO Reno 7 Pro 5G चे स्पेसिफिकेशन 

6.55 इंचाच्या फुलएचडी+ अ‍ॅमोलेड डिस्प्लेसह Reno 7 Pro बाजारात आला आहे. हा डिस्प्ले 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. ओप्पोनं फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कॉर्निंग गोरिल्ला ग्लास 5 ची सुरक्षा दिली आहे. 

हा मोबाईल अँड्रॉइड 11 ओएस बेस्ड कलरओएस 12 वर चालतो. रेनो7 प्रो 5जी फोनला MediaTek Dimensity 1200 चिपसेटची पॉवर देण्यात आली आहे. सोबत एआरएम जी77 एमसी9 जीपीयू मिळतो. हा ओप्पो फोन 12GB पर्यंतच्या LPDDR4x RAM सह बाजारात आला आहे आणि त्याला 256GB पर्यंतच्या UFS 3.1 स्टोरेजची जोड देण्यात आली आहे.  वर्चुअल रॅम फिचरच्या मदतीनं 7GB अतिरिक्त रॅम वाढवता येतो. म्हणजे एकूण 19GB RAM  मिळतो. 

या डिवाइसमध्ये 32 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स709 सेन्सर सेल्फी फ्रंट कॅमेऱ्याचं काम करतो. तर बॅक पॅनलवर 50 मेगापिक्सलच्या प्रायमरी सोनी आयएमएक्स766 सेन्सरसह ट्रिपल कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. ज्यात 8 मेगापिक्सलची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. 

OPPO Reno 7 Pro 5G मधील बॅटरी देखील तेवढीच खास आहे. कंपनीनं यात ड्युअल बॅटरीचा वापर केला आहे, म्हणजे फोनमध्ये दोन बॅटरी सेल आहेत. ज्या प्रत्येकी 2,250एमएएचच्या क्षमतेसह येतात आणि मिळून 4,450एमएएचची पावर देतात. ही बॅटरी 65W SUPERVOOC फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीने चार्ज करता येते. 

हे देखील वाचा:

टॅग्स :oppoओप्पोSmartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईडtechnologyतंत्रज्ञान