OPPO आपल्या लोकप्रिय रेनो लाईनअपमध्ये लवकरच नवीन स्मार्टफोन सादर करणार आहे. कंपनीनं ‘रेनो 7’ सीरीज अंतर्गत Oppo Reno 7, Oppo Reno 7 Pro आणि Oppo Reno 7 SE स्मार्टफोन लाँच करू शकते. हे फोन्स पुढील वर्षीच्या सुरुवातीला बाजारात येतील, परंतु या डिवाइसची माहिती गेल्या काही दिवसांपासून लीक होत आहे. आता या सिरीजमधील ओप्पो रेनो 7 प्रो बेंचमार्किंग साईट गीकबेंचवर दिसला आहे.
Oppo Reno 7 Pro चीनी बेंचमार्किंग साईटवर 17 नोव्हेंबरला लिस्ट करण्यात आला होता. या लिस्टिंगमधून फोनच्या OPPO PFDM00 या मॉडेल नंबरची माहिती मिळाली आहे. या लिस्टिंगमुळे फोन लवकरच लाँच होणार हे निश्चित झाले आहे आणि या फोनच्या काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.
OPPO Reno 7 Pro गिकबेंच लिस्टिंग
OPPO Reno 7 Pro ला गीकबेंचच्या सिंगल-कोर टेस्टमध्ये 828 आणि मल्टी-कोर टेस्टमध्ये 2547 पॉईंट्स मिळाले आहेत. लिस्टिंगमधून हा स्मार्टफोनच्या अँड्रॉइड 11 ओएसची माहिती मिळाली आहे. तसेच यात 3.00गीगाहर्ट्ज क्लॉक स्पीड असलेला ऑक्टकोर प्रोसेसर मिळेल हे समजले आहे. या फोनमध्ये 8 जीबी रॅम मिळेल असे सांगण्यात आले आहे, परंतु यापेक्षा जास्त व्हेरिएंट बाजारात येऊ शकतात. गीकबेंचनुसार OPPO Reno 7 Pro मीडियाटेकच्या डिमेनसिटी 1200 चिपसेटसह बाजारात येईल.
OPPO Reno 7 Pro चे लीक स्पेसिफिकेशन्स
Oppo Reno 7 Pro स्मार्टफोनमध्ये 6.5-इंचाचा कर्व एज असलेला OLED डिस्प्ले देण्यात येईल जो FHD+ रिजोल्यूशन आणि 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. ओप्पो रेनो 7 प्रो मध्ये क्वॉलकॉमचा Snapdragon 888 चिपसेट, 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 512GB पर्यंतची UFS 3.1 स्टोरेज मिळेल. या डिवाइसमधील 4500mAh ची बॅटरी 65W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करेल. इतर दोन फोन्स प्रमाणे यात देखील 32-मेगापिक्सलचा Sony IMX615 सेन्सर सेल्फी कॅमेऱ्याचे काम करेल. तर रियर कॅमेरा सेटअपमध्ये 50-मेगापिक्सलचा ओआयएस असलेला Samsung GN5 सेन्सर, 64-मेगापिक्सलचा OmniVision OV64B अल्ट्रावाईड कॅमेरा आणि 13-मेगापिक्सचा Samsung S5K3M5 टेलीफोटो कॅमेरा देण्यात येईल.