ओप्पो येत्या 25 नोव्हेंबरला आपली आगामी OPPO Reno 7 सीरीज सादर करणार आहे. या सीरिज अंतर्गत OPPO Reno 7, OPPO Reno 7 Pro आणि OPPO Reno 7 SE असे तीन फोन सादर केले जातील. या सीरिजची सुरुवात कंपनीच्या होम मार्केट चीनमधून होईल. आता लाँच होण्याआधीच OPPO Reno 7 सीरीज चीनमध्ये ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्म JD.com वर लिस्ट झाली आहे. त्यामुळे Reno 7, Reno 7 Pro, आणि Reno 7 SE स्मार्टफोनच्या डिजाइन आणि स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे.
OPPO Reno 7
Oppo Reno 7 स्मार्टफोन पंच होल कटआउट डिस्प्ले आणि ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपसह बाजारात येईल. तसेच हा स्मार्टफोन क्वालकॉमच्या के Snapdragon 778G चिपसेटसह सादर केला जाईल. या ओप्पो डिवाइसमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 65W चार्जिंग मिळेल. तसेच यात 64 मेगापिक्सलचा प्रायमरी रियर कॅमेरा देण्यात येईल. हा ओप्पो फोन चीनमध्ये 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतच्या स्टोरेजसह सादर केला जाईल. हा स्मार्टफोन स्टार रेन विश (ब्लू), डॉन गोल्ड आणि स्टारी नाईट ब्लॅकमध्ये लिस्ट करण्यात आला आहे.
OPPO Reno 7 Pro
OPPO Reno 7 Pro स्मार्टफोन देखील तीन कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. तसेच यात पंच होल डिस्प्ले आणि क्वाड रियर कॅमेरा सेटअपसह सादर मिळेल. हा प्रो मॉडेल मीडियाटेकच्या Dimensity 1200-Max चिपसेटसह सादर केला जाईल. या ओप्पो फोनमध्ये 4,500mAh बॅटरी आणि 65W फास्ट चार्ज मिळेल. फोनयामध्ये 12GB पर्यंत RAM आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळेल.
OPPO Reno 7 SE
OPPO Reno 7 SE हा या सीरिजमधील स्वस्त फोन असेल. जो अन्य फोन्स प्रमाणे तीन कलर ऑप्शनमध्ये सादर केला जाईल. यात देखील सेल्फीसाठी पंच होल कटआउट मिळेल. परंतु बॅक पॅनलवर ट्रिपल कॅमेरा सेटअप असेल. लिस्टिंगमधून फोनच्या 8GB/128GB स्टोरेज आणि 8GB/256GB स्टोरेज व्हेरिएंटची माहिती मिळाली आहे.