OPPO इंडियानं भारतात आपली Oppo Reno 7 सीरिज टीज करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे लवकरच ही सीरिज भारतात येईल हे निश्चित झालं आहे. या सीरिजमध्ये कोणते स्मार्टफोन सादर केले जातील याची माहिती मात्र अजून मिळाली नाही. परंतु लवकरच ती माहिती देखील समोर येईल. कंपनीनं गेल्यावर्षी नोव्हेंबर 2021 मध्ये आपल्या होम मार्केट चीनमध्ये Reno7 Series सादर केली होती.
चीनमध्ये या सीरिज अंतर्गत Oppo Reno 7 5G, Oppo Reno 7 Pro 5G आणि Oppo Reno 7 SE 5G असे तीन स्मार्टफोन आले आहेत. ज्यात 12GB RAM, 65W Fast Charging, 32MP सेल्फी कॅमेरा आणि 64MP रियर कॅमेरा असे स्पेक्स मिळतात.
OPPO Reno 7 5G चे स्पेसिफिकेशन्स
OPPO Reno 7 5G मध्ये 6.43 इंचाचा फुलएचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा अॅमोलेड पॅनल 90हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर आणि कॉर्निंग गोरिल्ला 5 ची सुरक्षा मिळते. फोनचे मॉर्निग गोल्ड, स्टारी नाईट ब्लॅक आणि स्टार रेन विश हे तीन कलर व्हेरिएंट आले आहेत.
OPPO Reno 7 5G अँड्रॉइड 11 आधारित कलरओएस 12 वर चालतो. या मोबाईलला क्वॉलकॉमच्या स्नॅपड्रॅगन 778जी चिपसेटची प्रोसेसिंग पॉवर मिळते. सोबत एड्रेनो 642एल जीपीयू देण्यात आला आहे. फोन 12 जीबी पर्यंतच्या रॅम आणि 256 जीबी पर्यंतच्या स्टोरेजला सपोर्ट करतो.
Reno 7 32 मेगापिक्सलचा सोनी आयएमएक्स709 सेल्फी सेन्सरसह लाँच झाला आहे. फोनमधील ट्रिपल रियर कॅमेरा सेटअपमध्ये 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर आहे. त्याचबरोबर 8 मेगापिक्सलची वाईड अँगल लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स मिळते. पॉवर बॅकअपसाठी हा ओप्पो फोन 4,500एमएएचच्या मोठ्या बॅटरीला सपोर्ट करतो. ही बॅटरी 65वॉट फास्ट चार्जिंगच्या मदतीने काही मिनिटांत चार्ज करता येईल.
हे देखील वाचा:
तुमच्यासाठीच बनलेत हे Smart TV; 15 हजारांच्या आत थिएटरचा अनुभव आणा घरात, फक्त काही दिवस सूट
OnePlus चा स्वस्त आणि मस्त 5G Phone येतोय; 20 हजारांच्या आत असू शकते किंमत, फीचर्स दमदार