OPPO नं कोणताही गाजावाजा न करता आपल्या ‘रेनो 7’ सीरीजचा विस्तार केला आहे. कंपनीनं काही दिवसांपूर्वी भारतात Oppo Reno 7 5G आणि Oppo Reno 7 Pro 5G असे दोन मॉडेल सादर केले होते. तर आज जागतिक बाजारात OPPO Reno 7 Z 5G ची एंट्री झाली आहे. या नवीन ओप्पो मोबाईलमध्ये Snapdragon 695, 64MP कॅमेरा आणि 33W फास्ट चार्जिंग देण्यात आली आहे.
OPPO Reno 7 Z 5G चे स्पेसिफिकेशन्स
OPPO Reno 7 Z 5G फोन अँड्रॉइड 11 सह कलरओएस 12 वर चालतो. प्रोसेसिंगसाठी या फोनमध्ये ऑक्टाकोर प्रोसेसर तसेच क्वॉलकॉमचा स्नॅपड्रॅगन 695 चिपसेट देण्यात आला आहे. सोबत LPDDR4x RAM आणि UFS 2.2 स्टोरेज मिळते. थायलंडमध्ये हा डिवाइस 8 जीबी रॅम व 128 जीबी इंटरनल स्टोरेजसह उतरवण्यात आला आहे. बेसिक कनेक्टिव्हिटी ऑप्शन्ससह इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात आला आहे. फोनमधील 4,500एमएएचची बॅटरी 33W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करते.
ओप्पो रेनो 7 झेड 5जी 6.43 इंचाच्या फुलएचडी+ अॅमोलेड डिस्प्लेसह बाजारात आला आहे. जो 60हर्ट्ज रिफ्रेश रेट आणि 180हर्ट्ज टच सॅम्पलिंग रेटला सपोर्ट करतो. फोटोग्राफीसाठी फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप आहे. ज्यात एलईडी फ्लॅशसह 64 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मोनोक्रोम लेन्स आणि 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आहे. हा ओप्पो फोन 16 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो.
हे देखील वाचा: