Oppo लवकरच आपली आगामी फ्लॅगशिप स्मार्टफोन सीरिज सादर करणार आहे. त्यामुळे ओप्पोचे चाहते देखील आगामी Oppo Reno 8 सीरीजची आतुरतेने वाट बघत आहेत. आता कंपनीनं या सीरिजची लाँच डेट सांगितली आहे. या सीरीजमध्ये Oppo Reno 8, Oppo Reno 8 Pro आणि Oppo Reno 8 Pro+ हे तीन स्मार्टफोन्स सादर केले जाऊ शकतात.
Oppo नं चीनी मायक्रोब्लॉगिंग साईट वीबोवरून Oppo Reno 8 सीरीजच्या लाँचचा अधिकृत पोस्टर शेयर केला आहे. या पोस्टरनुसार ही सीरीज चीनमध्ये 23 फेब्रुवारीला लाँच केली जाईल. चीनी टिप्सटर Digital Chat Station नं दिलेल्या माहितीनुसार, ओप्पो रेनो 8 सीरीजचा फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरसह बाजारात येईल.
Oppo Reno 8 Series चे लीक स्पेक्स
Oppo Reno 8 स्मार्टफोनमध्ये 6.43 इंचाचा Full HD+ OLED डिस्प्ले मिळेल, ज्यात 90Hz रिफ्रेश रेट मिळेल. हा फोन ऑक्टा कोर Dimensity 1300 प्रोसेसरसह बाजारात येईल. तर Oppo Reno 8 Pro स्मार्टफोनमध्ये 6.62 इंचाचा Full HD+ OLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो, ज्यात 120Hz रिफ्रेश रेट मिळेल. हा फोन Qualcomm Snapdragon 7 Gen 1 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो.
फोटोग्राफीसाठी सीरीजच्या सर्व फोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा आणि 32MP चा सेल्फी कॅमेरा मिळेल. ओप्पो रेनो 8 आणि 8 प्रो दोन्ही फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी मिळू शकते. ही बॅटरी 80W फास्ट चार्जिंगसह बाजारात येऊ शकते. Oppo Reno 8 सीरिज जूनच्या शेवटी भारतीय बाजारात दाखल होऊ शकते.