चिपसेट मॅन्युफॅक्चर क्वॉलकॉमनं दोन नवीन चिपसेट सादर केले आहेत. यात Snapdragon 8+ Gen 1 या फ्लॅगशिप तर Snapdragon 7 Gen 1 या मिडरेंज चिपसेटचा समावेश आहे. आता बातमी आली आहे की ओप्पोचा आगामी स्मार्टफोन क्वॉलकॉमच्या मिडरेंज चिपसेटसह बाजारात येणारा जगातील पहिला स्मार्टफोन असेल. Oppo Reno 8 Pro नव्या Qualcomm Snapdragon 7 Gen 1 चिपसेटसह बाजारात येईल. कंपनी 23 मेला चीनमध्ये हा डिवाइस सादर करणार आहे.
स्वतः कंपनीनं दिली बातमी
ओप्पोच्या अधिकृत वीबो अकाऊंटवरून ओप्पो रेनो 8 प्रोच्या लाँचची माहिती देण्यात आली आहे. तसेच यात स्नॅपड्रॅगन 7 जेन 1 चिपसेट असेल, जो सॅमसंग के 4nm मॅन्युफॅक्चरिंग नोडवर बनवण्यात आला आहे. हा प्रोसेसर जुन्या जेनरेशनपेक्षा 20 टक्के जास्त GPU परफॉर्मन्स आणि 30 टक्के वेगवान AI प्रोसेसिंग परफॉर्मन्स देऊ शकतो, असा दावा करण्यात आला आहे. त्याचबरोबर कंपनीनं स्वतः बनवलेली मारीसिलिकॉन एक्स आयएसपी इमेजिंग चिप देखील देण्यात येईल.
संभाव्य स्पेक्स
ओप्पो रेनो 8 प्रोच्या मागे ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. सोबत कंपनीची स्वतःची इमेजिंग चिप असल्यामुळे फोटोग्राफी शानदार होऊ शकते. फोनमध्ये 6.43-इंचाचा FHD + AMOLED डिस्प्ले दिला जाऊ शकतो. डिवाइस 8GB+128GB आणि 8GB+256GB मेमरी अशा स्टोरेज व्हेरिएंटसह सादर केला जाईल.