Oppo आपल्या रेनो सीरिजमध्ये फ्लॅगशिप स्मार्टफोन सादर करत असते. आगामी रेनो सीरिज वनप्लस 10 प्रोच्या डिजाईनसह सादर केली जाईल, अशी माहिती रेंडर्समधून मिळाली आहे. आता Oppo Reno 8 SE चे स्पेसिफिकेशन्स ऑनलाइन लीक झाले आहेत. यातून फोनच्या डिस्प्ले, प्रोसेसर आणि बॅटरीची माहिती मिळाली आहे. Oppo Reno 8 सीरीज जूनच्या अखेरपर्यंत भारतात लाँच होऊ शकते.
Oppo Reno 8 SE चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
91Mobiles नं टिपस्टर योगेश ब्रारच्या हवाल्याने आगामी रेनॉ सीरिजच्या फोनची माहिती दिली आहे. Oppo Reno 8 SE 6.43 इंचाचा फुल एचडीप्लस डिस्प्ले मिळेल. हा फोन अँड्रॉइड 12 ओएससह येईल, ज्यात MediaTek Dimensity 1300 SoC ची प्रोसेसिंग पावर मिळेल. कंपनी 6GB/128GB व 8GB/256GB असे दोन स्टोरेज ऑप्शन्स सादर करू शकते.
फोनच्या मागे ट्रिपल कॅमेरा सेटअप मिळेल, ज्यात 50 मेगापिक्सलचा मुख्य सेन्सर, 8 मेगापिक्सलची सेकंडरी लेन्स आणि 2 मेगापिक्सलचा थर्ड सेन्सर मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फोन 32 मेगापिक्सलचा सेल्फी कॅमेरा मिळेल. फोनमध्ये 80W फास्ट चार्जिंगसह 4,500mAh ची बॅटरी मिळू शकते. Oppo Reno 8 SE कधी लाँच होईल याची माहिती मिळाली नाही.