Oppo ने काही दिवसांपूर्वी चीनमध्ये Reno 6 सीरिजचे स्मार्टफोन लाँच केले होते. आता कंपनी या सीरीजमध्ये अजून एक स्मार्टफोन Oppo Reno6 Z लाँच करण्याची तयारी करत आहे. टिप्सटर अभिषेक यादवने OPPO Reno6 Z चे स्पेसिफिकेशन्स ट्वीटरवर शेयर केले आहेत. ओप्पोच्या आगामी OPPO Reno6 Z स्मार्टफोनवर कंपनी काम करत आहे, त्यामुळे हा स्मार्टफोन यावर्षीच्या शेवटपर्यंत लाँच केला जाऊ शकतो.
OPPO Reno6 Z लीक स्पेसिफिकेशन्स
OPPO Reno6 Z मध्ये कंपनी 6.43-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देऊ शकते. हा डिस्प्ले 60Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. तसेच हा डिस्प्ले Corning Gorilla Glass 5 प्रोटेक्शनसह सादर केला जाईल. ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये MediaTek Dimensity 800U चिपसेट, 8GB RAM आणि 256GB स्टोरेज मिळू शकते. या फोनमध्ये 4,310mAh बॅटरी आणि 30W फास्ट चार्जिंगला सपोर्ट देखील मिळू शकतो. फोनमध्ये Android 11 आधारित ColorOS 11.1 असण्याची शक्यता आहे.
Oppo Reno6 Z स्मार्टफोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप देण्यात येईल. यात 64 मेगापिक्सलचा प्राइमरी कॅमेरा सेन्सर दिला जाऊ शकतो. त्याचबरोबर 8MP ची अल्ट्रा वाईड अँगल लेन्स आणि 2MP चा मॅक्रो कॅमेरा सेन्सर मिळू शकतो. या फोनमध्ये 32MP चा फ्रंट कॅमेरा देण्यात येईल.