मे महिन्यात चीनमध्ये OPPO Reno8 सीरिज सादर करण्यात आली होती. तेव्हापासून या स्मार्टफोन्सची वाट कंपनीचे भारतीय चाहते पाहत आहेत. आता OPPO ची फ्लॅगशिप Reno8 सीरीज लवकरच भारतात लाँच होणार असल्याची बातमी आली आहे. कंपनीनं अधिकृत माहिती दिली नसली तरी माय स्मार्ट प्राईसच्या रिपोर्टनुसार ओप्पो रेनो 8 सीरीज भारतात येत आहे.
रिपोर्टमध्ये सांगण्यात आलं आहे की OPPO Reno8 सीरिज पुढील महिन्यात 18 जुलैला भारतीयांच्या भेटीला येऊ शकते. या फोनची एंट्री ऑनलाइन इव्हेंटच्या माध्यमातून केली जाईल. तसेच या सीरिजमध्ये Oppo Reno 8 आणि Oppo Reno 8 Pro स्मार्टफोन लाँच केले जातील. चीनमध्ये आलेला OPPO Reno8 Pro+ भारतात मात्र Oppo Reno 8 Pro नावानं उतरवला जाऊ शकतो.
OPPO Reno8 Pro
Oppo Reno8 Pro स्मार्टफोनमध्ये 120Hz रिफ्रेश रेट असलेला 6.7-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाईल. भारतात हा फोन मीडियाटेकच्या Dimensity 8100 Max SoC आणि MariSilicon X चिपसेटसह सादर केला जाऊ शकतो. हा फोन 12GB पर्यंत LPDDR5 RAM आणि 256GB UFS3.1 स्टोरेजसह सादर केला जाऊ शकतो.
फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप असेल. ज्यात 50MP Sony IMX766 सेन्सर, 8MP चा वाईड अँगल लेन्स आणि 2MP मॅक्रो कॅमेरा असेल. फोनमध्ये 32MP Sony IMX709 सेल्फी कॅमेरा दिला जाईल. Oppo Reno 8 Pro स्मार्टफोनमध्ये 4500mAh ची बॅटरी आणि 80W सुपर फ्लॅश चार्जिंगसह दिली जाईल.
OPPO Reno 8
OPPO Reno 8 फोनमध्ये 90Hz रिफ्रेश रेटसह 6.43-इंचाचा Full HD+ AMOLED डिस्प्ले दिला जाईल. मीडियाटेकचा Dimensity 1300 SoC देण्यात येईल. स्मार्टफोनमध्ये 50MP चा प्रायमरी कॅमेरा देण्यात आला आहे सेल्फीसाठी फोनमध्ये 32MP चा सेन्सर आहे. ओप्पोच्या या फोनमध्ये 4,500mAh ची बॅटरी आणि 80W फास्ट चार्जसह मिळेल.