भारतीय Smart TV मार्केटमधील गर्दी वाढत आहे. सुरुवातीला फक्त सॅमसंग, एलजी आणि सोनी या स्मार्टफोन निर्माण करणाऱ्या कंपन्या स्मार्ट टीव्ही सादर करत होत्या. परंतु आता त्यात एमआय, रेडमी, वनप्लस, नोकिया आणि रियलमीची भर पडली आहे. आता या सेगमेंटमधील स्पर्धा वाढणार आहे कारण, Oppo आपला स्मार्ट टीव्ही भारतात लाँच करणार आहे.
टिपस्टर मुकुल शर्माने ओप्पोच्या स्मार्ट टीव्हीची माहिती दिली आहे. त्यानुसार ओप्पो लवकरच भारतात आपला पहिला स्मार्ट टीव्ही लाँच करू शकते. कंपनीने या स्मार्ट टीव्हीच्या लाँचची कोणतीही माहिती दिली नाही. ओप्पोने चीनमध्ये याआधीच स्मार्ट टीव्हीची सीरीज सादर केली आहे. अचूक तारीख जरी समोर आलेली नसली तरी Oppo Smart TV पुढील वर्षी पहिल्या तिमाहीत हा नवीन स्मार्ट टीव्ही देशात पदार्पण करू शकतो.
Oppo Smart TV चे स्पेसिफिकेशन्स
चीनमध्ये आलेली ओप्पो स्मार्ट टीव्हीची K9 सीरीज भारतात सादर केली जाऊ शकते. या सीरीजमध्ये कंपनीने तीन मॉडेल सादर केले आहेत. ही सीरिज एलसीडी डिस्प्लेसह सादर करण्यात आली आहे. ज्यात HDR10+ certification आणि HLG सपोर्टसह 60Hz रिफ्रेश रेट देण्यात आला आहे. तसेच या टीव्ही सीरीजमध्ये क्वॉडकोर मीडियाटेक प्रोसेसर देण्यात आला आहे. कंपनीने हे स्मार्ट टीव्ही ColorOS TV 2.0 ऑपरेटिंग सिस्टमवर सादर केले आहेत.