गेले काही वर्ष स्मार्टफोन इंडस्ट्रीचं लक्ष चार्जिंग स्पीडवर केंद्रित झालं आहे असं चित्र निर्माण झालं आहे. स्मार्टफोन निर्मात्या कंपन्यांमध्ये सर्वाधिक वेगवान चार्जिंग स्पीड असलेला स्मार्टफोन लाँच करण्याची शर्यत सुरु आहे. गेल्यावर्षी पर्यंत 80 वॉट स्पीड सर्वाधिक मानला जात होता परंतु त्यानंतर शाओमीनं 120 वॉट, तर काही दिवसांपूर्वी Oneplus आणि Realme नं 150 वॉट चर्जिंग स्पीड असलेला फोन को लाँच केला आहे. परंतु आता Oppo 240 वॉट चार्जिंग स्पीड असलेला फोन लाँच करण्याची तयारी करत आहे.
नव्या चार्जिंग टेक्नॉलॉजीची एक बातमी चिनी टिपस्टर डिजिटल चाट स्टेशननं दिली आहे, त्यानुसार लवकरच एक मोबाईल निर्माता कंपनी आपला 240 वॉट चार्जिंग स्पीड असलेला फोन लाँच करणार आहे. या रिपोर्टमध्ये कंपनीच्या नावाचा उल्लेख करण्यात आला नाही. परंतु गेल्यावर्षीच Oppo 240W चार्जिंग टेक्नॉलॉजी सादर केली आहे, त्यामुळे हा चार्जर देखील ओप्पोचा असेल, असा अंदाज लावला जात आहे.
इतक्या वेगानं होईल चार्जिंग
एक कंपनी एक असा चार्जर बनवत आहे ज्याचा अडॅप्टर 24 वोल्ट आणि 10 एम्पियरला सपोर्ट करेल, जो 240 वॉट इतकी पावर देईल. रिपोर्टनुसार नवीन 240 वॉटचा चार्जर सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या सर्वात वेगवान चार्जरपेक्षा 20 टक्के जास्त वेगवान अअसेल. मीडिया रिपोर्टनुसार आगामी iQOO 10 Pro स्मार्टफोन 200 वॉट चार्जिंगसह येईल आणि फक्त 12 मिनिटांत फोन फुल चार्ज करेल. परंतु OPPO नं गेल्यावर्षी दाखवलेली 240 वॉट चार्जिंग टेक्नॉलॉजी 4500mAh बॅटरी असलेला फोन फक्त 9 मिनिटांत चार्ज करेल.