Oppo Watch Free भारतीय बाजारात लाँच झाला आहे. हा स्मार्टवॉच 14 दिवसांचा बॅटरी बॅकअप देतो. तसेच यात SpO2 सेन्सर, हार्ट रेट मॉनिटर आणि स्लिप मॉनिटर असे हेल्थ फीचर्स देण्यात आले आहेत. यात फास्ट चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे, त्यामुळे फक्त 5 मिनिटांच्या चार्जवर हा स्मार्टवॉच 1 दिवस वापरता येईल. चला जाणून घेऊया Oppo Watch Free ची किंमत, स्पेसिफिकेशन्स आणि फिचर.
Oppo Watch Free चे स्पेक्स आणि फिचर
या स्मार्टवॉचमध्ये 280×456 पिक्सल रिजोल्यूशन असलेला 1.64 इंचाचा डिस्प्ले देण्यात आला आहे. जो एक अॅमोलेड डिस्प्ले आहे. ओप्पो वॉच फ्री 5ATM (50 मीटर) पर्यंत वॉटरप्रूफ बिल्डसह येतो. स्मार्टवॉच मध्ये एंबियंट लाईट सेन्सर देण्यात आला आहे. Oppo Watch Free मध्ये कनेक्टिविटीसाठी Bluetooth v5.0 देण्यात आलं आहे. तसेच हा डिवाइस Android 6.0 आणि iOS 10.0 वर चालणाऱ्या डिवाइसेसची कनेक्ट करता येतील.
Oppo Watch Free मध्ये 100 पेक्षा जास्त स्पोर्ट्स मोड देण्यात आले आहेत. यात बॅडमिंटन, क्रिकेट आणि स्कीइंगचा देखील समावेश आहे. या स्मार्टवॉचमध्ये हार्ट रेट सेन्सर, SpO2 सेन्सर आणि स्लीप ट्रॅकिंग, असे हेल्थ फिचर मिळतात. यातील स्नोरिंग मॉनिटर फिचर तुम्ही झोपताना किती काळ घोरत होता हे ट्रॅक करतं. यातील 230mAh ची बॅटरी सिंगल चार्जवर 14 दिवस चालते, असा दावा कंपनीनं केला आहे.
Oppo Watch Free Price in India
ओप्पोनं आपल्या स्मार्टवॉचची किंमत भारतात 5,999 रुपये ठेवली आहे. कंपनीनं या स्मार्टवॉचचा फक्त ब्लॅक कलर व्हेरिएंट भारतात उतरवला आहे. परंतु कंपनीनं अजूनही हा स्मार्टवॉच खरेदीसाठी कधी उपलब्ध होईल हे सांगितलं नाही.
हे देखील वाचा:
यंदा राहू नका सिंगल! या डेटिंग अॅप्सच्या मदतीनं मिळवा Valentine’s Day 2022 च्या आधी डेट
29 हजारांच्या आत आला शानदार OPPO Reno 7 5G; लूक असा कि लोकांच्या नजरा वळतील तुमच्याकडे