Oppo लवकरच नवीन स्वस्त 5G Phone सादर करणार आहे. हा फोन बेंचमार्किंग साईट गिकबेंचवर लिस्ट झाला आहे. तसेच ओप्पोचा हा स्मार्टफोन TENAA आणि 3C सर्टिफिकेशन्स वेबसाईटवर देखील स्पॉट झाला आहे. या लिस्टिंगमधून फोनच्या काही महत्वाच्या स्पेसिफिकेशन्सची माहिती मिळाली आहे. या फोनचं नाव मात्र अजून समोर आली नाही, लिस्टिंगमध्ये Oppo PFUM10 या मॉडेल नंबरचा उल्लेख करण्यात आला आहे.
Oppo PFUM10 चे स्पेसिफिकेशन्स
लिक्स आणि लिस्टिंगनुसार, हा फोन 6.43-इंचाच्या Full HD+ AMOLED डिस्प्लेसह सादर केला जाऊ शकतो. हा डिस्प्ले 1080 x 2400 पिक्सल रिजोल्यूशनला सपोर्ट करू शकतो. या स्मार्टफोनला स्नॅपड्रॅगॉन 480+ या 5G प्रोसेसरची ताकद देण्यात येईल. सोबत ग्राफिक्ससाठी Adreno 619 GPU देण्यात येईल. Geekbench च्या सिंगल कोर टेस्टमध्ये 2833 पॉइन्ट्स आणि मल्टी कोर टेस्टमध्ये 7365 पॉइन्ट्स मिळाले आहेत.
ओप्पोच्या या स्मार्टफोनमध्ये 48MP ड्युअल रियर कॅमेरा सेटअप दिला जाऊ शकतो. सोबत 2MP चा सेकंडरी कॅमेरा देण्यात येईल. तसेच ओप्पोच्या या फोनमध्ये 16MP चा सेल्फी कॅमेरा दिला जाऊ शकतो. हा फोन 8GB रॅम आणि Android 11 सह बाजारात येऊ शकतो. सोबत 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. पॉवर बॅकअपसाठी यात 4,385mAh ची बॅटरी आणि 33W फास्ट चार्जिंगसह मिळू शकते. ओप्पोचा हा फोन इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेन्सरसह सादर होऊ शकतो.
हे देखील वाचा:
फक्त 500 रुपयांमध्ये आला 15 तास चालणारा Bluetooth Neckband; जाणून घ्या वैशिष्ट्ये
लै भारी! 35 हजारांच्या डिस्काउंटसह स्मार्टफोन घेण्याची शेवटची संधी, पुन्हा मिळणार नाही अशी ऑफर