शहरं
Join us  
Trending Stories
1
CM म्हणून शिंदेंना मोठी पसंती, उद्धव ठाकरेंना किती मते; फडणवीस-राज ठाकरेंना किती टक्के कौल?
2
“नाना पटोलेंनी मुख्यमंत्री होणार असे कुठेही म्हटले नाही”; विजय वडेट्टीवार स्पष्टच बोलले
3
Exit Poll: दोन्ही NCP तुल्यबल; एकनाथ शिंदेच ठरणार वरचढ, उद्धव ठाकरेंना किती जागा मिळणार?
4
१०७ जागांसह भाजपा सर्वांत मोठा पक्ष, महाविकास आघाडीला १०२ जागा; नवीन Exit Pollचा अंदाज
5
अदानी समूहाला आणखी एक झटका; अडचणीत असताना मोठा आंतरराष्ट्रीय करार रद्द
6
महायुती की मविआ, कुणाला मिळणार 'सिंहासन'? विभागनिहाय कुणाचं पारडं ठरणार जड? असा आहे लेटेस्ट 'Exit Poll'!
7
"दुसऱ्या महायुद्धानंतर निर्माण झालेल्या व्यवस्था अन् संस्था कोलमडत आहेत"; गयानाच्या संसदेत काय बोलले PM मोदी?
8
मनोज जरांगेंची ऐनवेळी निवडणुकीतून माघार; ४८ टक्के मराठा समाजाने महायुतीला दिली पसंती
9
Exit Poll: २०१९ मध्ये एकमेव खरा ठरलेला एक्झिट पोल आला; महायुती-मविआच्या मतांत १० टक्क्यांचे अंतर...
10
“गुलाल आम्ही उधळणार, महायुतीची सत्ता ५ वर्ष टिकणार, एकनाथ शिंदेच CM होणार”: संतोष बांगर
11
मालवणमधील छत्रपती शिवाजी महाराज पुतळा दुर्घटना प्रकरण; हायकोर्टाकडून आरोपीला जामीन
12
“अमित शाह यांनी CM भाजपाचा असेल असे कधी म्हटले नाही”; महायुतीतील नेत्याचे सूचक विधान
13
‘लाडकी बहीण’ योजनेचा फायदा महायुतीला मिळेल का? देवेंद्र फडणवीस म्हणाले, “महिलांनी मतदान...”
14
“अदानींविरोधात अमेरिकेत काढलेले अटक वॉरंट म्हणजे देशासाठी शरमेची गोष्ट”: संजय राऊत
15
“लाच देऊन कंत्राटे मिळवल्याचे स्पष्ट, भ्रष्ट गौतम अदानींना अटक का करत नाही?”: नाना पटोले
16
इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांना अटक होणार? इंटरनॅशनल क्रिमिनल कोर्टानं जारी केलं 'अरेस्ट वॉरंट'
17
"सरकार तर स्थापन होऊ द्या"; मुख्यमंत्रीपदाच्या चर्चेवरुन काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्याने नाना पटोलेंना झापलं
18
IND vs AUS: ना विराट, ना रोहित, ना बुमराह; ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर 'हा' खेळाडू ठरेल 'हिरो'- पुजारा
19
गुगलला क्रोम ब्राऊझर विकावा लागण्याची शक्यता; अमेरिकन सरकार दबाव टाकणार
20
IND vs AUS: "विराट म्हणजे क्रिकेटचा सुपरस्टार"; ऑस्ट्रेलियन खेळाडूची पत्नी 'किंग कोहली'वर फिदा

तुम्हालाही मोबाईलवर OTP येत नाहीये? पाहा त्यामागे काय आहे नक्की कारण

By ऑनलाइन लोकमत | Published: March 09, 2021 5:42 PM

Mobile OTP : सध्या अनेकांना ओटीपी न येण्यासारख्या समस्या भेडसावत आहेत

ठळक मुद्दे सध्या अनेकांना ओटीपी न येण्यासारख्या समस्या भेडसावत आहेतफ्रॉडपासून वाचण्यासाठी ट्रायनं सुरू केली DLT नोंदणी प्रक्रिया

सध्या OTP द्वारे कोणतंही काम करण्याच्या किंवा ते व्हेरिफाय करण्याच्या पद्धतीत वाढ झाली आहे. अनेकदा ओटीपी मिळाला नाही तरी आपली कामं रखडून जातात किंवा ती होतच नाहीत. अनेक लोकांना सध्या ओटीपी न येण्याची समस्या जाणवत आहे. बँक ट्रान्झॅक्शन, ई-कॉमर्स वेबसाईट यांचा वन टाईप पासवर्ड म्हणजेच ओटीपी ग्राहकांना मिळण्यात समस्या निर्माण होत आहेत. सध्या CoWIN चा किंवा आरोग्य सेतू अॅपद्वारे लसीकरणासाठी नोंदणी करतानाही अनेकांना समस्यांना सामोरं जावं लागत आहे. त्यांना ओटीपीच मिळत नसल्यामुळे त्यांना लोकांना लॉग इन करण्यास समस्या येत आहेत. परंतु अद्यापही टेलिकॉम ऑपरेटर्सनं याबद्दल कोणतीही माहिती दिलेली नाही. रिपोर्ट्सनुसार ही समस्या नव्या SMS रेग्युलेशनमुळे निर्माण झाल्याचं म्हटलं जात आहे. नव्या SMS रेग्युलेशन SMS फ्रॉड थांबवण्यासाठी दूरसंचार नियमाक मंडळाकडून सुरू करण्यात आलं आहे. परंतु या प्रोसेसमुळे अनेक ससम्या निर्माण होऊ लागल्या आहेत. यामध्ये ओटीपी न येणं ही एक मोठी समस्या आहे. रिपोर्ट्सनुसार ट्रायनं यासंदर्भात काही गाईडलाईन्स जारी केल्या आहे. यामध्ये सर्व टेलिकॉम ऑपरेटर्सना DLT नोंदणी करणं आवश्यक आहे. यामागील उद्देश ओटीपी फ्रॉड आणि एसएमएस थांबवणं हे आहे. हे लागू करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांनी ही प्रोसेस सुरू केली आहे. परंतु यामुळे पुश नोटिफिकेशन पूर्णपणे बाधित झालं आहे. लोकांना आता त्यांच्या मोबाईलवर ओटीपी मिळवण्यातही समस्या येत आहेत. DLT नोंदणीनंतर काय होणार?DLT सिस्टमध्ये रजिस्टर्ड टेम्पलेटवाल्या प्रत्येक SMS कंटेन्टला व्हेरिफाय केल्यानंतरच डिलिव्हर केलं जाणार आहे. या प्रोसेसला स्क्रबिंगही म्हटलं जातं. ८ मार्चपासून ही प्रोसेस लागू करण्यात आली आहे. यामुळेच अनेकांना ओटीपी मिळण्यात समस्या येत आहेत. टेलिकॉम कंपन्यांनी बँक आणि कंपन्यांच्या आपले टेम्पलेट रजिस्टर करण्यास पहिलेच सांगितलं होतं. त्यांना यासाठी ७ मार्चपर्यंतची वेळही देण्यात आली होती. ज्या कंपन्यांनी आपले टेम्पलेट सजिस्टर केले नाही त्यांना ओटीपी मिळण्यास समस्या निर्माण होत आहे. जेव्हा ते रजिस्टर करतील तेव्हा ओटीपी मिळण्यास पुन्हा सुरूवात होईल. ही समस्या केव्हा दूर होईल हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेलं नाही.

टॅग्स :MobileमोबाइलTRAI-Telecom Regulatory Authority of Indiaट्रायsmsएसएमएसbankबँकfraudधोकेबाजीShoppingखरेदी