शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन दिवाळीत नेते बंडोबांना थंडोबा करण्याच्या मोहिमेवर; महायुती, महाआघाडीसाठी पुढील ४ दिवस वाटाघाटीचे
2
आजचे राशीभविष्य : शुक्रवार 1 नोव्हेंबर 2024; आज अवैध कामांपासून दूर राहावे, क्रोध आणि वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
दिवाळी झटका! LPG सिलिंडरचा भाव वाढला, पटापट चेक करा दिल्ली ते मुंबईपर्यंतचे नवे दर
4
२४ तासांत १०० विमानांना बॉम्बची धमकी, एअर इंडियाच्या ३६, विस्ताराच्या ३५ फेऱ्यांवर परिणाम  
5
नेपाळी नोटेवरील नकाशात दाखवली तीन भारतीय क्षेत्रे, नोटा छापण्याचे कंत्राट दिले चिनी कंपनीला
6
मनोज जरांगेंचे ‘एमएमडी’ समीकरण; विधानसभा लढवण्याची घोषणा
7
मुंबईकरांना भुरळ लाइटवेट दागिन्यांची! धनत्रयोदशीला बाजारात २५० कोटींची उलाढाल
8
निवडणुकीतील गैरप्रकार थांबवा, अन्यथा कारवाई, मुख्य निवडणूक अधिकारी चोक्कलिंगम यांचा इशारा
9
राज्यातील बेरोजगारीवर न बोलणारे हे कसले सरकार? काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा सवाल
10
पाकिस्तानसह जगभर दिवाळीची धूम, अमेरिकेत शाळांना सुट्टी
11
राज्यात आलेली सर्वाधिक परकीय गुंतवणूक फडणवीसांच्या नावावर
12
आयपीएल रिटेंशन : रोहित शर्मा मुंबईकडेच; माही केवळ ४ कोटींमध्ये खेळणार
13
समतोल ‘मन’ हेही ‘धन’; आज त्याची पूजा करू या!
14
मध्य रेल्वेने प्रवाशांना धरले वेठीस; ४ दिवस सुटीचे वेळापत्रक लागू
15
19 मिनिटांत 22 किलोमीटरचे अंतर पार अन् मिळाले जीवदान
16
खंडणीसाठी धमकावल्याप्रकरणी छोटा राजन टोळीचे ५ जण अटकेत
17
इस्रायली महिला फायटर्सचे इराणवर हल्ले!
18
११ वर्षीय पीडितेच्या गर्भपातास परवानगी; रक्त नमुना, टिश्यू जतन करण्याचे निर्देश 
19
‘राज’ की बात, भाजप अन् शिंदेंची अडचण!
20
दिवाळी, छटपूजेनिमित्त मध्य रेल्वेच्या ५८३ गाड्या

15,600mAh क्षमता असलेल्या अवाढव्य बॅटरीसह ‘हा’ 5G स्मार्टफोन लाँच; सिंगल चार्जमध्ये मिळणार 6 दिवसांचा बॅकअप  

By सिद्धेश जाधव | Published: August 23, 2021 5:09 PM

Big Battery Smartphone: Oukitel WP15 स्मार्टफोन 299.99 डॉलरमध्ये अलीएक्सप्रेसवर लिस्ट करण्यात आला आहे. ही किंमत जवळपास 22,200 रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा

ठळक मुद्देहा फोन 5 तासांत फुल चार्ज होतोOukitel WP15 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो

Oukitel ने आज 15600mAh बॅटरीसह Oukitel WP15 5G रगेड स्मार्टफोन लाँच केला आहे. हा जगातील पहिला 5G रगेड स्मार्टफोन आहे, असा Oukitel ने दावा केला आहे. या फोनमध्ये मीडियाटेक डायमेन्सिटी 700 चिपसेट, 8GB रॅम आणि 48 मेगापिक्सलचा सोनी सेन्सर असे दमदार स्पेक्स देखील देण्यात आले आहेत. रिवर्स चार्जिंग फिचरमुळे या फोनचा वापर पावरप्रमाणे देखील करता येतो.  

Oukitel WP15 ची किंमत 

Oukitel WP15 स्मार्टफोन 299.99 डॉलरमध्ये अलीएक्सप्रेसवर लिस्ट करण्यात आला आहे. ही किंमत जवळपास 22,200 रुपयांमध्ये रूपांतरित होते. हा फोन भारतात थेट खरेदीसाठी उपलब्ध झालेला नाही, परंतु अली एक्सप्रेसवरून हा फोन विकत घेता येऊ शकतो.  हे देखील वाचा: 12GB रॅम, 5000mAh बॅटरीसह Vivo Y33s भारतात लाँच; जाणून घ्या शानदार स्मार्टफोनची किंमत

Oukitel WP15 की स्पेसिफिकेशन 

Oukitel WP15 5G रगेड स्मार्टफोनमध्ये 6.52 इंचाचा एचडी+ डिस्प्ले देण्यात आला आहे. हा फोन मीडियाटेक डायमेंसिटी 700 प्रोसेसरवर चालतो. तसेच या फोनमध्ये 8 जीबी रॅम आणि 128 जीबी स्टोरेज देण्यात आली आहे. ही स्टोरेज माइक्रोएसडी कार्डच्या माध्यमातून 256 जीबी पर्यंत वाढवता येते.  

Oukitel WP15 5G मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो, ज्यात 48 मेगापिक्सलचा मुख्य Sony सेन्सर आहे, त्याचबरोबर 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 0.3 मेगापिक्सलचा वर्च्युल लेन्स देण्यात आली आहे.हा फोन 8 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. या फोनची खासियत 15,600 एमएएचची दमदार बॅटरी आहे, जी 18 वॉट फास्ट चार्जिंग टेक्नॉलॉजीला सपोर्ट करते.   हे देखील वाचा: Alert! हे 8 अ‍ॅप्स चुकूनही करू नका डाउनलोड; आणखीन 120 अ‍ॅप्स अजूनही अँड्रॉइडवर उपलब्ध

हा फोन 5 तासांत फुल चार्ज होतो, असे कंपनीने सांगितले आहे. तसेच ही बॅटरी 1300 तासांचा स्टॅन्डबाय टाइम आणि 90 तासांचा कॉलिंग टाइम देते. हा रगेड फोन असल्यामुळे हा फोन वॉटर आणि डस्ट रेजिस्टन्ससह येतो आणि उंचावरून पडल्यावर देखील हा सुरक्षित राहतो. एवढ्या मोठ्या बॅटरीसह येणारा हा पहिलाच रगेड स्मार्टफोन असेल.   

 

टॅग्स :Smartphoneस्मार्टफोनAndroidअँड्रॉईड