गेल्या वर्षी पॅनासोनिक पी ७७ हे मॉडेल ६,९९० रूपये मूल्यात लाँच करण्यात आले होते. या मूळ मॉडेलमध्ये ८ जीबी इनबिल्ट स्टोअरेज होते. आता हे स्टोअरेज १६ जीबीपर्यंत वाढविण्यात आले असून हे नवीन व्हेरियंट भारतीय ग्राहकांना सादर करण्यात आले आहे. विशेष म्हणजे स्टोअरेज वाढले असले तरी याचे मूल्य कमी करण्यात आले आहे. आता पॅनासोनिक पी ७७ हा स्मार्टफोन ५,२९९ रूपये मूल्यात ग्राहकांना मिळणार आहे. व्हाईट आणि ग्रे या दोन रंगांमध्ये सादर करण्यात आलेले हे मॉडेल ग्राहकांना फक्त फ्लिपकार्ट या शॉपींग पोर्टलवरून खरेदी करता येणार आहे.
पॅनोसोनिक पी ७७ या मॉडेलमधील उर्वरित फिचर्स आधीप्रमाणेच आहेत. अर्थात यात पाच इंच आकाराचा आणि १२८० बाय ७२० पिक्सल्स क्षमतेचा डिस्प्ले प्रदान करण्यात आला आहे. १ गेगाहर्टझ क्वॉड-कोअर प्रोसेसरने सज्ज असणार्या या स्मार्टफोनची रॅम एक जीबी तर इनबिल्ट स्टोअरेज १६ जीबी असून ते मायक्रो-एसडी कार्डच्या मदतीने ३२ जीबीपर्यंत वाढविणे शक्य आहे. यात ८ आणि २ मेगापिक्सल्स क्षमतांचे दोन कॅमेरे आहेत. हे मॉडेल अँड्रॉईडच्या लॉलिपॉप प्रणालीवर चालणारे आहे. यातील बॅटरी २,००० मिलीअँपिअर क्षमतेची असेल. पॅनोसोनिक पी ७७ हा स्मार्टफोन ड्युअल सीमकार्डला सपोर्ट करणारा आहे. यात फोर-जी व्हिओ-एलटीई नेटवर्क सपोर्टसह ब्ल्यू-टुथ, वाय-फाय, जीपीएस, मायक्रो-युएसबी आदी फिचर्स असतील. तर यात अॅक्सलेरोमीटर, गायरोस्कोप, ग्रॅव्हीटी, अँबिअंट लाईट सेन्सर्सदेखील प्रदान करण्यात आले आहेत.