शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Election: मविआच्या 22 उमेदवारांची अनामत रक्कम जप्त, सर्वाधिक काँग्रेसचे; भाजपचा एकही नाही!
2
“सुप्रीम कोर्टाने काय करावे, हे आता एक पक्ष सांगणार का?”; चंद्रचूड यांनी ठाकरे गटाला फटकारले
3
चिन्मय दास यांच्या अटकेवरून बांगलादेशात हाहाकार! पोलिसांनी डागले 'ग्रेनेड', लाठीचार्जही केला; एकाचा मृत्यू
4
'मी नेहमी संविधानाच्या मर्यादेचा आदर केला...', संविधान दिनानिमित्त पंतप्रधान मोदींचे भाष्य
5
“अशा निवडणुका पाकिस्तान, अफगाणिस्तानात होत नसतील, आयोग जिवंत आहे का”; संजय राऊत संतापले
6
मनोज जरांगेंचे ठरले; सरकार स्थापन झाल्यावर तारीख जाहीर करणार, पुन्हा बेमुदत उपोषणाला बसणार
7
जगातील सर्वात वृद्ध व्यक्तीचे वयाच्या 112 व्या वर्षी निधन; काही दिवसांपूर्वीच दीर्घायुष्यासंदर्भात केलं होतं भाष्य
8
पाकिस्तानात तख्तापालट होण्याचे संकेत? इम्रान खान यांच्या समर्थकांसोबत सैन्य; हस्तांदोलन, मिठ्या मारल्या 
9
"दहशतवादी संघटनांना चोख प्रत्युत्तर देणार"; २६/११च्या हल्ल्याच्या वर्षपूर्तीनिमित्त पंतप्रधान मोदींचे आश्वासन
10
झुनझुनवाला यांनी 10 मिनिटांत कमावले ₹105 कोटी; 'या' दोन शेअर्समुळे लागली लॉटरी; पडला पैशांचा पाऊस!
11
"अजित पवारांनी सरेंडर होऊन आमची..."; रामदास कदमांचे मोठं विधान, म्हणाले, "काहीही केलं तरी..."
12
नाना पटोलेंनी दिल्ली गाठली, मल्लिकार्जून खरगे-राहुल गांधींची भेट घेतली; नेमके काय घडले?
13
BLOG: अमित ठाकरे निवडणुकीच्या चक्रव्यूहात शिरले खरे, पण...; 'राजपुत्रा'चं नेमकं काय चुकलं? सहा प्रमुख मुद्दे
14
...म्हणून मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार जाहीर करण्यास विलंब; भाजपचे 'या' कामाला प्राधान्य
15
आधारवाडीतील इमारतीच्या पंधराव्या मजल्यावर भीषण आग; अग्निशमन दलाचे वाहन बिघडले
16
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
17
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
18
"हिंदूंच्या हक्कांसंदर्भात बोलणारे निर्लज्ज, ...या सरकारला भारतातील अल्पसंख्यकांची चिंता नाही"; काय म्हणाले ओवेसी?
19
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
20
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले

तुम्हीही तुमचे Passwords ब्राउजरमध्ये सेव्ह करता? आताच करा ‘हे’ काम, नाही तर पडू शकतं महागात 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 21, 2022 7:51 PM

इंटरनेटचा वापर वाढल्यामुळे अनेक ऑनलाइन अकाऊंट्स बनवावे लागतात. त्यांचे पासवर्ड्स देखील लक्षात ठेवावे लागतात. अशावेळी अनेकजण पासवर्ड्स क्रोम किंवा अन्य ब्राउजर्सवर सेव्ह करून ठेवतात.  

सध्या इंटरनेटचा वापर मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. त्यामुळे अनेक अ‍ॅप्स आणि वेबसाईट्सवर अकाऊंट  बनवावं लागतं. एवढ्या अकाऊंट्सचे पासवार्ड्स लक्षात ठेवणे देखील कठीण काम आहे. अशावेळी, गुगल क्रोम आणि अन्य ब्राउजर्समधील ‘रिमेम्बर पासवर्ड्स’ फीचरची मदत घ्यावी लागते. इथे तुमचे पासवर्ड्स आपोआप सेव्ह होतात आणि जेव्हा गरज असते तेव्हा इन्सर्ट देखील होतात. परंतु या फीचरचा वापर सुरक्षित आहे का?  

Google Chrome 

क्रोम तुमचा ई-मेल आणि पासवर्ड एका ‘सीक्रेट की’ सह एन्क्रिप्ट करतो, त्यामुळे फक्त फक्त तुमच्या डिवाइसवरून पासवर्ड अ‍ॅक्सेस करता येतो. तुमचे पासवर्ड्स गुगलला देखील अ‍ॅक्सेस करता येत नाहीत. तुम्हाला देखील हे पासवार्ड्स अ‍ॅक्सेस करण्यासाठी तुमच्या जी-मेल आयडीच्या पासवर्डची आवश्यकता असते. त्यामुळे तुमचे सर्व पासवर्डस एकाच वेळी अ‍ॅक्सेस करता येत नाहीत.  

अन्य ब्राउजर्सची सुरक्षा कशी आहे? 

क्रोमच्या पासवर्ड मॅनेजरमध्ये पासवर्ड अ‍ॅक्सेस करण्यासाठी जीमेल आयडीचा पासवर्ड विचारला जातो. क्रोमच्या या स्टेपमुळे पासवर्ड सुरक्षित राहतात. परंतु मोजिला फायरफॉक्स सारख्या अन्य ब्राउजरमध्ये चुकीच्या अ‍ॅक्टिविटीचा अलर्ट मिळत नाही. परंतु याचा थेट अर्थ या प्लेटफॉर्म्सवर पासवर्ड सेव्ह करणे योग्य नाही असा होत नाही.  

त्वरित करा हे काम  

जर तुमच्या सोशल मीडिया किंवा अन्य ऑनलाइन प्लॅटफॉर्म्सचे पासवर्ड्स तुम्ही पासवर्ड मॅनेजरमध्ये केले असतील तर ते त्वरित काढून टाकावे. हे पासवर्ड्स तुम्ही लिहून ठेऊ शकता. जर तुमचं जी-मेल अकाऊंटचं हॅक झालं तर तुमचे सर्व पासवर्ड्स सहज हॅकर्सच्या हाती लागू शकतात. तसेच तुमच्या प्रत्येक अकाऊंटवर पासवर्ड सह ‘टू फॅक्टर ऑथेन्टिकेशन’ चा वापर करावा, जेणेकरून सुरक्षा डबल होईल.  

टॅग्स :googleगुगलtechnologyतंत्रज्ञान