पेमेंट ॲप PhonePe ने अकाउंट एग्रीगेटर सेवा सुरू केली आहे. PhonePe कंपनीने त्यांची सहकारी कंपनी PhonePe Technology Services Pvtच्या माध्यमातून ही सेवा लॉन्च केली. मागील वर्षी ऑगस्टमध्ये रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) पेमेंट ॲप PhonePe ला अकाउंट एग्रीगेटरच्या मदतीने काम करण्यासाठी NBFC-AA परवान्यासाठी तत्वतः मान्यता दिली होती.
मोठ्या बॅंकासोबत करार फोन पे ने दिलेल्या माहितीनुसार, अकाउंट एग्रीगेटर सेवा ग्राहकांना त्यांचा सर्व आर्थिक डेटा उदाहरणार्थ, बॅंक स्टेटमेंट, विमा पॉलिसी आणि टॅक्स फायलींग अशा बाबी नियमन केलेल्या वित्तीय संस्थासोबत शेअर करता येणार आहे. या प्रणालीचा उपयोग कर्जासाठी अर्ज करण्यासाठी, विमा खरेदी करण्यासाठी आणि गुंतवणुकीचा सल्ला घेण्यासाठी केला जाऊ शकतो. दरम्यान, PhonePe Pay ने येस बँक, फेडरल बँक आणि AU स्मॉल फायनान्स बँक यांसारख्या बॅंकासोबत करार केला आहे. "जूनच्या अखेरीपूर्वी मोठ्या बँकांसह इतर अनेक वित्तीय माहिती पुरवणाऱ्या (FIPs) बॅंकांमध्ये सामील होण्याची शक्यता आहे", असं कंपनीनं सांगितलं.
लक्षणीय बाब म्हणजे अकाउंट एग्रीगेटर रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाद्वारे नियमन केलेली एक संस्था आहे, जे कोणत्याही व्यक्तीला सुरक्षितपणे आणि डिजिटल पद्धतीने डेटा ॲक्सेस करण्यास मदत करते. यामध्ये संबंधित व्यक्तीच्या संमतीशिवाय डेटा शेअर केला जाऊ शकत नाही.