नवी दिल्ली - देशामध्ये नोटबंदीनंतर डिजिटल पेमेंट अॅप्समध्ये खूप मोठी वाढ झाली आहे. नोटबंदीनंतर लोकांनी कॅश नसल्याने विविध अॅप्सच्या मदतीने सर्वात जास्त पेमेंट केले आहे. तसेच गेल्या काही दिवसांपासून कोरोना व्हायरस आणि लॉकडाऊनमुळे लोकांनी डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन दिले आहे. आता देशात डिजिटल पेमेंट युजर्स वाढत आहे. देशातील मोठ्या टेक्नोलॉजी कंपन्या सुद्धा डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देत आहे. मात्र आता देशातील एका डिजिटल पेमेंट अॅपने भारतातील आपली सर्व्हिस बंद करण्याची घोषणा केली आहे. तुम्ही जर या अॅपचा वापर करत असाल तर लवकर आपले पैसे यातून काढून घ्या आणि आपलं अकाऊंट डिअॅक्टिव्ह करा.
मीडिया सोर्सने दिलेल्या माहितीनुसार, PayPal हे डिजिटल पेमेंट अॅप देशातून बंद करण्यात येणार आहे. आता या अॅपची सेवा 1 एप्रिलपासून बंद करण्याची घोषणा करण्यात येणार आहे. मात्र आंतरराष्ट्रीय पेमेंटसाठी PayPal चा वापर सुरू राहणार आहे. जर तुम्ही पे पलचा वापर करत असाल तर आपल्या अकाऊंटला डिअॅक्टिव्ह करू शकता. जर आपण अकाऊंट डिअॅक्टिव्ह करू इच्छित असाल तर तुम्हाला ही प्रोसेस फॉलो करावी लागणार आहे.
- सर्वात आधी PayPal च्या वेबसाईटवर जा. त्यानंतर सेटिंगमध्ये जा.
- सेटिंगमध्ये गेल्यानंतर अकाऊंट ऑप्शनमध्ये जा. यानंतर आपल्या बँकच्या अकाउंट नंबर टाका.
- नवीन पेजवर जाऊन क्लोज अकाऊंटवर क्लिक करा.
- जर तुमचे अकाउंट अशाप्रकारे बंद होणार नसेल तर तुम्ही ईमेल वरूनही या अकाऊंट बंद करू शकता.
PayPal जगभरात जवळपास 190 देशात आपली सर्व्हिस देते. या देशात जवळपास 100 मिलियन अकाऊंट मेंबर आहेत. भारतात PayPal ने 2017 मध्ये आपली सेवा सुरू केली होती. डिजिटल पेमेंट ही एक वेबसाईट आहे. ज्यावरून ऑनलाईन पेमेंट केलं जातं. तर याच्या मदतीने अनेक युजर्सं आंतरराष्ट्रीय लेवलवर ट्रान्झॅक्शन करू शकतात. PayPal च्या मदतीने युजर्स एका देशातून दुसऱ्या देशात अत्यंत सोप्या पद्धतीने पैसे ट्रान्सफर करू शकतात. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
अलर्ट! QR कोड स्कॅन करून पेमेंट करताय?, वेळीच व्हा सावध नाहीतर...; अशी घ्या काळजी
ऑनलाईन व्यवहार करण्याकडे हल्ली सर्वांचाच अधिक कल असतो. मात्र गेल्या काही दिवसांपासून सायबर गुन्हेगारीत वाढ झाली आहे. QR कोडच्या मदतीने युजर्सना जाळ्यात अडकवलं जात आहे. एखाद्या दुकानात किंवा पेट्रोल पंपावर QR कोड स्कॅन करून पेमेंट करीत असाल तर वेळीच सावध होण्याची सध्या गरज आहे. दुकानदारला ऑनलाईन पैसे पाठवताना क्यूआर कोडचा वापर हमखास केला जातो. मात्र यामुळे फसवणूक होत असल्याची माहिती समोर आली आहे. Quick Response (QR) हे सर्वात आधी जपानमध्ये बनवण्यात आलं होतं. आता भारतात याचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. क्यूआर कोड फिशिंग म्हणजे नेमकं काय आहे आणि यापासून कसा धोका आहे याबाबत जाणून घेऊया.
ज्या प्रकारे तुम्ही डिजिटल देवाण घेवाण करत असतानाच फ्रॉडचे प्रमाण हे सर्वाधिक असते. कॉन्टॅक्टलेस पेमेंट करताना अनेक जण स्कॅन करून पेमेंट ट्रान्सफर करीत असतात. फ्रॉडस्टर त्यावेळी याचा गैरफायदा घेत असतात. क्यूआर कोडला बदल करतात. ज्यामुळे पेमेंट फ्रॉडस्टरच्या अकाऊंटला जातं. यावेळी क्यूआर कोड बदलून तसेच क्यूआर कोड टाकल्यानंतर क्यूआर कोड फिशिंग केलं जातं. त्यामुळे पैसे दुकानदाराच्या खात्यात न जाता थेट फ्रॉडस्टरच्या अकाऊंटमध्ये जातं. क्यूआर कोड फिशिंगची वेगवेगळी पद्धत आहे.