नवी दिल्ली – देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजला आहे. दिवसेंदिवस कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. अशातच लसीकरण मोहिमेवर सरकारने अधिक भर दिला आहे. १ मे पासून देशभरात १८ ते ४४ वयोगटातील नागरिकांसाठी लसीकरण सुरू करण्यात आलं आहे. परंतु अनेक ठिकाणी लसीचा साठा उपलब्ध नसल्याने नागरिकांचा पंचाईत होत आहे.
यातच देशातील सर्वात मोठ्या डिजिटल अँप पेटीएमनं कोविड वॅक्सिन स्लॉट सर्च करण्यासाठी एक नवं फिचर लॉन्च केले आहे. Paytm Vaccine Slot Finder या नावानं हे फिचर आहे. पेटीएमचे संस्थापक विजय शेखर शर्मा यांनी ट्विटरवरून याबाबत माहिती दिली आहे. त्यामुळे आता पेटीएमवर युजर्सला तुमच्या परिसरात लसीकरण केंद्रावर उपलब्ध असणाऱ्या लसीच्या स्लॉटबाबत अलर्ट देणार आहे. हे फिचर कसं काम करतं हे जाणून घेऊया.
विजय शेखर शर्मा यांनी गुरुवारी ट्विटमध्ये सांगितले की, कंपनी कोविड वॅक्सिन स्लॉटसाठी एक नवा फिचर लॉन्च करत आहे. ज्यात युजर्स स्लॉट पाहू शकतात. या टूलच्या माध्यमातून युजर्सला त्यांच्या परिसरात लसीचा साठा उपलब्ध झाल्यास स्लॉटबाबत अलर्ट मिळणार आहे. त्याचसोबत नवीन स्लॉट उपलब्ध झाल्यानंतर Paytm Chat च्या द्वारे रियल टाइम उपलब्धता आणि अलर्टही युजर्सला मिळणार आहे.
पेटीएमचं म्हणणं आहे की, कंपनी रियल टाइम देशभरात उपलब्ध असणाऱ्या लसीच्या साठ्याबद्दल ट्रॅक करत आहेत. Paytm Vaccine Slot Finder द्वारे युजर्सला नवा वॅक्सिन स्लॉट ओपन झाल्यानंतर स्लॉट बुक करू शकता आणि तातडीने अलर्ट मिळवू शकता.
रशिया भारताला देणार Sputnic-V चे आणखी दीड लाख डोस
नवी दिल्ली आणि मॉस्को येथील काही अधिकाऱ्यांनुसार रशिया कमीतकमी चार ऑक्सिजन उत्पादन करणारे ट्रक दिल्लीला पाठवत आहे. वीजेचा पुरवठा झाल्यानंतर २०० बेड्सच्या रुग्णालयाला ऑक्सिजन पुरवठा करू शकतो. "आम्ही यापूर्वीच चार ट्रकची खरेदी केली आहे आणि अधिक मिळवण्याचे प्रयत्न करत आहोत, जेणेकरून ऑक्सिजनची कमतरता भासणार नाही. हे ट्रक रशियाच्या IL-76 या विमानानं या आठवड्यात भारतात पोहोचतील," असंही सांगण्यात आलं आहे. १ मे पासून देशात लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला सुरूवात झाली. या दिवशीच Sputnik-V या लसीच्या दीड लाख डोसची पहिली खेप भारतात आली होती. ही लस ९० टक्क्यांपेक्षा अधिक प्रभावी असल्याचं सांगण्यात आलं आहे. १२ एप्रिल रोजी भारतात आपात्कालिन वापरासाठी या लसीला मंजुरी देण्यात आली होती.