Philips TAH6506BK Over Ear Wireless हेडफोन्स भारतात सादर करण्यात आले आहेत. हे हेडफोन्स सिंगल चार्जवर 30 तास प्ले बॅक टाइम देतात, असा दावा कंपनीनं केला आहे. तसेच फक्त 15 मिनिटांच्या चार्जवर 2 तासांचा प्ले बॅक टाइम मिळवता येतो. यात अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशन (ANC) फिचर देण्यात आलं आहे, तसेच यात 32mm neodymium ड्रायव्हर्स, ब्लूटूथ 5.0 आणि ब्लूटूथ मल्टीपल पेयरिंग देखील मिळते.
Philips TAH6506BK चे स्पेसिफिकेशन्स
Philips TAH6506BK ओवर-ईयर वायरलेस हेडफोनमध्ये 32mm neodymium ड्रायव्हर्सचा वापर करण्यात आला आहे. यातील ANC फिचर आजूबाजूचा आवाज कॅन्सल करून चांगली ऑडियो क्वॉलिटी मिळवून देण्यास मदत करतं. तसेच ब्लूटूथ पेयरिंगमुळे एकाच वेळी दोन डिवाइस कनेक्ट करता येतात. यातील ब्लूटूथ 5.0 कनेक्टिव्हिटी 10 मीटर पर्यंतची रेंज देते.
हे हेडफोन्स कंट्रोल करण्यासाठी यात मल्टी-फंक्शन बटन (MFB) देण्यात आलं आहे. हे बटन म्यूजिक, कॉल आणि वॉयस असिस्टंट कंट्रोल करण्यास मदत करतं. यात फ्लॅट-फोल्डिंग डिजाइन आणि ट्रॅव्हल पाउच देण्यात आला आहे. या हेडफोन्सचा फ्रिक्वेन्सी रिस्पॉन्स 20,000Hz पर्यंतचा आहे.
हे फिलिप्स हेडफोन्स सिंगल चार्जवर 30 तासांचा बॅटरी बॅकअप देतात. परंतु यासाठी ANC मोड ऑफ असावा लागतो. अॅक्टिव्ह नॉइज कॅन्सलेशनसह 25 तासांचा प्ले बॅक टाइम मिळतो. यात यूएसबी टाइप-सी पोर्ट चार्जिंगसाठी देण्यात आला आहे. 15 मिनिटांच्या फास्ट चार्जिंगवर 2 तासांचा बॅटरी बॅकअप मिळवता येतो.
Philips TAH6506BK ची किंमत
Philips च्या या नाव्ह्या वायरलेस हेडफोनची किंमत 5,999 रुपये ठेवण्यात आली आहे. हे हेडफोन्स फक्त काळ्या रंगात विकत घेता येतील. ऑनलाईन खरेदीसाठी तुमहाला अॅमेझॉनवर जावं लागेल तर ऑफलाईन देखील हे हेडफोन्स विकत घेता येतील.