कंपनीनं बुधवारी Apple इव्हेंटदरम्यान आयफोन 14 सादर केला. यामध्ये आयफोन 13 प्रमाणेच A15 Bionic चिपसेट देण्यात आला आहे. परंतु यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्याचं कंपनीकडून सांगण्यत आलाय. यामध्येी 12 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. यापूर्वी कंपनीनं आपल्या फोनमधून हेडफोन जॅक आणि चार्जर काढला होता. यावेळी कंपनीनं आता सिमकार्ड स्लॉटच काढण्यात आला आहे.
आयफोन 14 हा ई सिमवर काम करणार आहे. भारतीय मॉडेल्समध्ये मात्र सिम कार्ड स्लॉट दिला जाऊ शकतो अशा शक्यता वर्तवण्यात येतायत. कंपनीनं यामध्ये सॅटलाईट फीचरही दिलंय. ज्या ठिकाणी सेल्युलर टॉवर नाही त्या ठिकाणी हे फीचर कामी येईल. विशेष करून हे फीचर रिमोट एरिया आणि आपात्कालिन परिस्थितीसाठी आणण्यात आलंय. या फीचरद्वारे विना सिमकार्ड सॅटेलाईटद्वारे कॉलिंग करता येईल. सॅटेलाईट फीचर हे विशेष करून अमेरिका आणि कॅनडासाठी असेल. भारतात हे फीचर मिळणार नाही. दोन वर्षांसाठी हे फीचर मोफत असेल. परंतु त्यानंतर यासाठी पैसे मोजावे लागतील. आयफोन 14 ची किंमत 799 डॉलर्स आणि आयफोन 14 प्लसची किंमत 899 डॉलर्स इतकी असेल.आयफोन 14 मध्ये कंपनीनं 6.1 इंचाचा डिस्प्ले दिला आहे. तर दुसरीकडे प्लस व्हेरिअंटमध्ये 6.7 इंचाचा डिस्प्ले देण्यात आलाय. यामध्ये रिअर 12 मेगापिक्सेल + 12 मेगापिक्सेल ड्युअल कॅमेरा सेटअप देण्यात आलंय. तर फ्रन्टलाही 12 मेगापिक्सेल ट्रू डेप्थ कॅमेरा देण्यात आलाय. स्टँडर्ड व्हेरिअंट 16 सप्टेंबरपासून तर प्लस व्हेरिअंट 7 ऑक्टोबरपासून विक्रीसाठी उपलब्ध असेल.
Phone 14 Pro मध्येकाय?आयफोन 14 प्रो मध्ये नॉचचं डिझाईन बदलण्यात आलंय. यामध्ये पूर्वीच्या तुलनेत छोटी नॉच देण्यात आली आहे. याशिवाय अँड्रॉईडमध्ये पूर्वीपासून मिळणारं ऑलवेज ऑन डिस्प्ले फीचरही यात देण्यात आलं आहे. परंतु हे फीचर फक्त प्रो मॉडेल्स मध्येच मिळेल. याशिवाय नॉचमध्ये अॅनिमेशनही देण्यात आलंय. आयफोन प्रो आणि आयफोन प्रो मॅक्समध्ये नवा A16 Bionic चिपसेट देण्यात आलाय.
48 मेगापिक्सेल कॅमेराआयफोन 14 मध्ये 48 मेगापिक्सेल कॅमेरा देण्यात आला आहे. यामध्ये कॅमेरा सेटअप पूर्वीप्रमाणेच दिसून येतंय. परंतु कंपनीनं यात अनेक बदल केलेत. कॅमेरा सेन्सर्सही नवे देण्यात आले आहेत. आयफोन 14 प्रो ची किंमत 999 डॉलर्स इतकी असेल. तर आयफोन 14 प्रो मॅक्सची किंमत 1099 डॉलर्स असेल.