नवी दिल्ली - मोठे व्हिडीओ पाहणे, गेम खेळणे यामुळे फोन गरम होणे हे काही नवीन नाही. चार्जिंगवेळीही फोन गरम होत असतो. पण, फोनवर काहीही काम सुरू नसताना तो खूप गरम होण्याचे प्रकार सतत होत असतील तर मात्र हे गंभीर आहे.
तुमचा फोन हॅक झाला असण्याचे हे लक्षण आहे. हॅकरने फोनमध्ये स्पायवेअर सोडलेले असते. सुरू असलेल्या डेटाच्या चोरीमुळे फोन गरम होत असतो. फोनची बॅटरी संपत असते, डेटाही वेगाने कमी होत असतो. तुमच्या स्मार्टफोनमधून स्पायवेअर हटवण्यासाठी फोन फॅक्ट्री रिसेट करणे हा एकमेव पर्याय असतो.