सध्या अनेक स्मार्टफोन्समध्ये गुगलची लेटेस्ट ऑपरेटिंग सिस्टम अँड्रॉइड 12 आहे. अशा युजर्ससाठी चिंताजनक बातमी आली आहे. या स्मार्टफोन्समधील ‘डर्टी पाईप’ बगचा शोध, CM4all नावाच्या वेब डेव्हलपमेंट फर्मच्या मॅक्स केलरमॅन यांनी लावला आहे. हा बग सिस्टम बेस्ड अॅक्सेस मिळवू शकतो आणि बॅक डोरमधून हॅकर्स एंट्री देऊ शकतो.
बॅक डोरमधून एंट्री मिळवल्यावर हॅकर्स युजर्सचं फेक अकाऊंट बनवू शकतात. तसेच फोनमधील माहिती बदलू शकतात. हा बग एन्क्रिप्टेड व्हॉट्सअॅप मेसेज वाचू शकतो आणि मेसेजमध्ये फेरफार व बँकिंग फ्रॉडसाठी जबाबदार ठरू शकतो. ज्या फोन्समध्ये अँड्रॉइड 12 ऑपरेटिंग सिस्टम नाही, अशा फोन्सना या बगपासून कोणताही धोका नाही. तसेच सर्वच अँड्रॉइड 12 ओएस असलेले डिवाइस यामुळे प्रभावित होऊ शकत नाहीत.
बगमुळे प्रभावित होणारे डिवाइस
Kellermann यांच्या मते, Google Pixel 6 बद्दल धोक्याचा इशारा फेब्रुवारीमध्ये देण्यात आला होता. त्यावर मार्चच्या सिक्योरिटी पॅचमध्ये काम करण्यात आलं आहे कि नाही हे समजलं नाही, त्यामुळे अजूनही धोका कायम आहे. तसेच Samsung Galaxy S22 डिवाइसवर देखील या बगचा परिणाम दिसू शकतो. इतरही काही अँड्रॉइड 12 डिवाइसेज ‘डर्टी पाइप’ च्या हल्ल्याला बळी पडू शकतात.
असा करा बचाव?
थर्ड पार्टी अॅप इन्स्टॉल करताना अधिकृत सोर्सचा वापर करणं आवश्यक आहे. तसेच अँड्रॉइड वेळोवेळी अपडेट करावा. तसेच स्मार्टफोनमध्ये लेटस्ट सिक्योरिटी पॅच इंस्टॉल केल्यानं देखील संरक्षण होऊ होऊ शकतं.
हे देखील वाचा: