पंतप्रधान नरेद्र मोदी यूपीआय पेमेन्ट सर्व्हिसला सातत्याने प्रोत्साहन देत आहेत. यामुळे यूपीआय ऑनलाइन पेमेंट सिस्टिम केवळ भारतातच नव्हे, तर परदेशातही प्रसिद्ध होत आहे. या यूपीआय पेमेन्ट सिस्टिमच्या मजबूतीमुळे चीन आणि पाकिस्तान सारख्या देशांचेही धाबे दणाणले आहेत. यातच आता चीन आणि मालदीव यांच्यातील वाढत्या जवळीकतेवर तोडगा म्हणून UPI हे एक प्रभावी पाऊल ठरत आहे.
श्रीलंका-मॉरिशस बनणार नवे टुरिस्ट प्लेस -चीनकडे झुकने मालदीवला चांगलेच महागात पडणार आहे. कारण भारताने चीनची घेराबंदी केली आहे आणि डिजिटल पद्धतीने मालदिवचीही घेराबंदी केली आहे. अगदी सोप्या शब्दात समजायचे झाल्यास, मालदीव हे भारतीयांसाठी एक मोठे टुरिस्ट प्लेस आहे. तेथे लाखो टुरिस्ट दर वर्षी फिरायला जातात. मात्र आता, भारतीय टुरिस्ट लक्ष्यद्वीवसोबतच श्रीलंका आणि मॉरिशसकडे वळू शकतात. कारण मोदी सरकारने या देशांमध्ये ऑनलाइन पेमेंट सुविधा यूपीआय लॉन्च केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी श्रीलंका आणि मॉरिशसमध्ये व्हर्च्यूअली यूपीआय सर्व्हिस लॉन्च केली आहे.
मालदीवचं मोठं नुकसान होणार -पंतप्रधान मोदी म्हणाले, यूपीआय सर्व्हीस भारत, मॉरिशस आणि श्रीलंकेतील पर्यटन वाढविण्यास उपयुक्त ठरेल. ज्या देशांमध्ये यूपीआय सर्व्हीस आहे, त्या देशांमध्ये फिरायला जाण्यासाठी पर्यटक अधिक रस दाखवतील, अशी आशा आहे. पीएम मोदींच्या या वक्तव्याने मालदीव एवजी श्रीलंका आणि मॉरिशसकडे पर्यटकांचा कल वाढू शकतो. यामुळे मालदीवला मोठा आर्थिक फटका बसण्याची शक्यता आहे. एवढेच नाही, तर चीनच्या मालदीव प्लॅनलाही मोठा झटका बसू शकतो.
डिजिटल पेमेन्टच्या बाबतीत भारत आघाडीवर - डिजिटल पेमेंटसंदर्भात बोलायचे झाल्यास, या यादीत भारत आघाडीवर आहे. नुकतेच फ्रान्ससह एकूण 11 देशांमध्ये यूपीआय सर्व्हिस लॉन्च करण्यात आली होती. तसेच श्रीलंका आणि मॉरिशसमध्येही आता ही सुविधा लॉन्च करण्यात आली आहे. याच बरोबर आता यूपीआय पेमेंट सुविधा असलेल्या देशांची संख्या 11 वरून 13 वर पोहोचली आहे.