पंतप्रधान नरेंद्र मोदी नुकतेच G-7 शिखर परिषदेसाठी इटलीला गेले होते. तेथे इटलीच्या पंतप्रधान जॉर्जिया मेलोनी देखील उपस्थित होत्या. या वेळी घडलेली एक गोष्ट जबरदस्त चर्चेत राहिली, ती म्हणजे, जॉर्जिया मेलोनी आणि पंतप्रधान मोदी यांचा सेल्फी. या सेल्फीचा व्हिडिओ जॉर्जिया मेलोनी यांनी आपल्या एक्स हॅन्डलवरही शेअरही केला होता.
ज्या फोनच्या सहाय्याने मेलोनी यांनी पंतप्रधान मोदींसोबत सेल्फी घेतला तो अॅप्पलचा लेटेस्ट iPhone 15 Pro Max असल्याचे दिसत आहे. तर जाणून घेऊयात या फोनची किंमत आणि डिस्काउंट आणि मिळणाऱ्या ऑफरसंदर्भात...
iPhone 15 Pro Max ची किंमत -जर आपण हा फोन अॅप्पलच्या वेबसाइटवरून खरेदी केला, तर याची किंमत 1 लाख 59 हजार 900 रुपये एढी आहे. मात्र, हाच फोन आपण ई-कॉमर्स वेबसाइट अॅमेझॉनवरून खरेदी केला तर आपपल्याला 1 लाख 48 हजार 900 रुपयांना मिळेल. याशिवाय, आपण या फोनवर बँक ऑफरचा फायदाही घेऊ शकता. तसेच, या फोनवर 44 हजार 250 रुपयांची एक्सचेन्ज ऑफरही मिळत आहे. मात्र, ही ऑफर आपल्या जुन्या फोनचे मॉडेल आणि त्याच्या स्थितीवर अवलंबून आहे.
असे आहे स्पेसिफिकेशन्स -फोनच्या फीचर्ससंदर्भात बोलायचे झाल्यास, आयफोन 15 प्रो मॅक्स मॉडेलमध्ये आपल्याला 6.7 इंचांचा सुपर रेटिना एक्सडीआर डिस्प्ले मिलतो. हा डिसप्ले प्रमोशन टेक्नॉलॉजीसह येतो. या फोनमध्ये अॅप्पलची A17 प्रो चिप आहे. यामुळे जबरदस्त परफॉरमन्स मिळतो. कंपनी याला पॉवरहाऊस म्हणून संबोधित करते. फोटोग्राफीसाठी याला 48MP चा कॅमेरा देण्यात आला आहे. जो लो लाइटमध्येही जबरदस्त फोटो कॅप्चर करतो. युजर्स 24mm, 28mm, 35mm फोकल लेंथदरम्यान स्विच करू शकतात. तसेच झूमला 5x ते 120x पर्यंत घेऊन जाऊ शकतात. अॅप्पलच्या या मॉडेलमध्ये 4K व्हिडिओ रिकॉर्डिंग फिचरही मिळते.