शाओमीचा सब-ब्रँड पोको आपला नवीन बजेट स्मार्टफोन 30 सप्टेंबरला सादर करणार आहे. हा फोन Poco C31 नावाने भारतात येईल अशी माहिती कंपनीने दिली आहे. आता Poco C31 चा प्रोडक्ट पेज फ्लिपकार्टवर लाईव्ह करण्यात आला आहे. हा फोन बिग बिलियन डेज सेलच्या माध्यमातून विकला जाईल.
Poco C31 चे स्पेसीफिकेशन्स
पोकोच्या इंडिया वेबसाईटवर Poco C31 च्या खास स्पेसिफिकेशन्सचा खुलासा करण्यात आला आहे. वेबसाईटनुसार हा फोन MediaTek Helio G35 प्रोसेसरसह बाजारात येईल. फोनमध्ये 4GB RAM रॅम देण्यात येईल. हे दोन्ही फिचर गेल्यावर्षी सादर झालेल्या Poco C3 मध्ये देखील दिसले होते.
Poco C31 मध्ये बॅक पॅनलवर फिंगरप्रिंट सेन्सर देण्यात येईल. तसेच हा फोन वॉटर-ड्राप नॉच डिजाईनसह सादर केला जाईल. यातील तिन्ही कडा बेजेल असतील आणि बॉटमला रुंद भाग देण्यात येईल. Poco C3 मध्ये 13MP चा ट्रिपल रियर कॅमेरा, 5MP चा सेल्फी कॅमेरा आणि 10W फास्ट चार्जिंगसह 5,000mAh बॅटरी असे फीचर्स देण्यात आले होते. त्यामुळे आगामी Poco C31 मध्ये यापेक्षा चांगले स्पेसिफिकेशन्स मिळतील अशी अपेक्षा आहे. हा एक बजेट फोन असल्यामुळे या फोनची किंमत निश्चितच 10,000 रुपयांच्या आत असू शकते.