पोकोने ठरल्याप्रमाणे आज भारतीय बाजारात आपला नवीन बजेट स्मार्टफोन सादर केला आहे. कंपनीने आपल्या ‘सी’ सीरिजमध्ये POCO C31 लाँच केला आहे. 4GB RAM, MediaTek Helio G35 चिपसेट आणि 5,000mAh बॅटरी असलेल्या या फोनची किंमत 8,499 रुपयांपासून सुरु होईल. हा फोन शॉपिंग साइट फ्लिपकार्टवर विक्रीसाठी उपलब्ध होईल.
POCO C31 स्पेसिफिकेशन्स
पोको सी31 मध्ये 20:9 अस्पेक्ट रेशियो, 1600 x 720 पिक्सल रिजोल्यूशन असलेला डिस्प्ले देण्यात आला आहे. हा एक 6.53 इंचाचा एचडी+ एलसीडी डिस्प्ले आहे. पाण्यापासून वाचण्यासाठी या फोनवर पी2आई नॅनोकोटिंग देण्यात आली आहे. हा अँड्रॉइड 10 ओएसवर लाँच केला गेला आहे जो मीडियाटेकच्या हीलियो जी35 चिपसेटवर चालतो. ग्राफिक्ससाठी यात पॉवरवीआर जीई8320 जीपीयू देण्यात आला आहे. डिवाइसमध्ये 4GB पर्यंतचा RAM आणि 64GB पर्यंतची इंटरनल स्टोरेज मिळते.
फोटोग्राफीसाठी पोको सी31 मध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. ज्यात 13 मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, 2 मेगापिक्सलची मॅक्रो लेन्स आणि 2 मेगापिक्सलची पोर्टरेट लेन्स मिळते. हा फोन 5 मेगापिक्सलच्या फ्रंट कॅमेऱ्याला सपोर्ट करतो. पॉवर बॅकअपसाठी पोको सी31 मध्ये 5,000एमएएचची मोठी बॅटरी देण्यात आली आहे.
POCO C31 ची किंमत
पोको सी31 च्या 3GB RAM आणि 32GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत 8,499 रुपये ठेवण्यात आली आहे. तर फोनचा 4GB RAM आणि 64GB स्टोरेज व्हेरिएंट 9,499 रुपयांमध्ये विकत घेता येईल. फ्लिपकार्ट बिग बिलियन डेज सेलमध्ये ही किंमत अनुक्रमे 7,999 रुपये आणि 8,999 रुपये करण्यात येईल.