Poco F4 स्मार्टफोन भारतात लाँच होणार याची माहिती स्वतः कंपनीनं ट्विटरवरून दिली आहे. हा एक “Display आणि Sound” फोकस्ड फोन असेल, असं सांगण्यात आलं आहे. आता Poco F4 5G फोनचे फोटोज ऑनलाइन लीक झाले आहेत. त्यामुळे याच्या डिजाइनची माहिती मिळाली आहे. तसेच स्मार्टफोनचे स्पेक्स देखील समोर आले आहेत.
टिप्सटर Paras Guglani नं RootMyGalaxy सोबत मिळून आगामी Poco F4 5G चे काही लाईव्ह फोटोज शेयर केले आहेत. ज्यात हा फोन फ्लॅट बॅक पॅनलसह दिसत आहे. या फोटोजमध्ये फोनचा ग्रीन कलर व्हेरिएंट दिसत आहे. फोनच्या मागे काळ्या रंगाच्या कॅमेरा मॉड्यूलमध्ये ट्रिपल कॅमेरा सेटअप दिसत आहे. कॅमेरा सेटअपच्या खाली एलईडी फ्लॅश लाईट दिसत आहे.
पोको एफ4 फोनमध्ये 64MP चा AI कॅमेरा मुख्य सेन्सरचं काम करेल, असं या लीक फोटोजमधून समोर आलं आहे. परंतु अन्य रियर कॅमेरा सेन्सर्सची माहिती मात्र मिळाली नाही. फोनच्या उजवीकडे वॉल्यूम रॉकर आणि पावर बटन मिळेल ज्यात फिंगरप्रिंट सेन्सर एम्बेड असेल. जुन्या रिपोर्ट्सनुसार Poco F4 फोन Redmi K40S चा रिब्रँडेड व्हर्जन असू शकतो. लीक फोटोजवरून ही बाब अधिकच स्पष्ट झाली आहे.
POCO F4 चे संभाव्य स्पेसिफिकेशन्स
POCO F4 स्मार्टफोनमध्ये 6.3-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा आगामी पोकोफोन Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो. सोबत 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. POCO F4 स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर आधारित MIUI 13 वर चालेल.
या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. ज्यात प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल, सोबत 13MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 5MP ची टेलीफोटो लेन्स मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 32MP चा कॅमेरा देण्यात येईल. आगामी पोको स्मार्टफोन 4,5000mAh च्या बॅटरीसह येईल जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.