POCO F4 5G च्या ग्लोबल लाँचची माहिती गेले काही दिवस सतत येत आहेत. परंतु भारतीय लाँचची कोणतीही ठोस माहिती समोर आली नव्हती. आता स्वतः कंपनी ट्विट करून POCO F4 5G भारतात येत्या 23 जूनला लाँच केला जाईल, असं सांगितलं आहे. देशात या स्मार्टफोनला वनप्लस, रियलमी आणि मोटोरोलाकडून चांगलीच टक्कर मिळू शकते.
POCO F4 5G इंडिया लाँच
POCO F4 5G स्मार्टफोन येत्या 23 जूनला भारतासह जागतिक बाजारात देखील सादर केला जाईल, अशी माहिती कंपनीनं दिली आहे. या दिवशी एका इव्हेंटचे आयोजन करण्यात येईल जो संध्यकाळी 5 वाजून 30 मिनिटांनी सुरु होईल. या इव्हेंटचं थेट प्रक्षेपण पोको इंडियाच्या ऑफिशियल वेबसाईट, सोशल मीडिया प्लॅटफॉर्म व युट्युब चॅनेलसह फ्लिपकार्टवरून देखील बघता येईल.
POCO F4 चे स्पेसिफिकेशन्स
POCO F4 स्मार्टफोनमध्ये 6.3-इंचाचा FHD+ AMOLED डिस्प्ले देण्यात येईल. हा डिस्प्ले 120Hz रिफ्रेश रेटला सपोर्ट करेल. हा आगामी पोकोफोन Qualcomm Snapdragon 870 प्रोसेसरसह सादर केला जाऊ शकतो. सोबत 12GB पर्यंत रॅम आणि 256GB पर्यंतची स्टोरेज मिळू शकते. POCO F4 स्मार्टफोन अँड्रॉइड 12 वर आधारित MIUI 13 वर चालेल.
या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. ज्यात प्रायमरी कॅमेरा 50MP चा असेल, सोबत 13MP चा अल्ट्रा वाईड सेन्सर आणि 5MP ची टेलीफोटो लेन्स मिळेल. सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी फ्रंटला 32MP चा कॅमेरा देण्यात येईल. आगामी पोको स्मार्टफोन 4,5000mAh च्या बॅटरीसह येईल जी 67W फास्ट चार्जिंगला सपोर्ट करू शकते.